“पावसात गांडूळ जन्मला येतं, पाऊस संपला गांडुळांचं अस्तित्व संपून जातं”; शिंदे गटाची तुलना गांडुळाबरोबर कुणी केली…

बाळासाहेब ठाकरे यांनी विचारले की, ते दगड का बुडत आहेत. त्यावर तिथे उपस्थित असलेल्या अतिशहाणा संजय राऊत यांनी उत्तर दिले की, तो दगड बुडत आहे कारण, त्या दगडाने बाळासाहेब ठाकरे यांचा हात सोडला आहे.

पावसात गांडूळ जन्मला येतं, पाऊस संपला गांडुळांचं अस्तित्व संपून जातं; शिंदे गटाची तुलना गांडुळाबरोबर कुणी केली...
Follow us
| Updated on: Jan 23, 2023 | 9:42 PM

मुंबईः बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे आणि शिंदे गटाकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहे. त्यातच शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र लावण्यावरून शिंदे गटाने ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावर खासदार संजय राऊत यांनी आज बाळासाहेब आणि शिवसेना यांच्यावर बोलताना सांगितले की, शिवसेना अखंड आणि अभंग आहे.

शिवसेनेचा गौरव करताना संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले की, देशात शिवसेना ही फक्त आता उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानेच ओळखले जाते. शिंदेमिंदे यांच्यामुळे शिवसेना वगैरे काही ओळखल जात नसल्याचे टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली.

खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टाकी करताना म्हणाले की, ही शिवसेना एकच आहे, देशात दुसरी शिवसेना निर्माण होऊच शकत नाही.

ज्या लोकांनी शिवसेना संपवण्याची कटकारस्थानं केली आहेत. त्यांना सांगावं वाटतं की आता भविष्य हे फक्त शिवसेनेचे असेल असा विश्वासही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यातील राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी शिवसेना संपवण्याची जरी प्रयत्न केला तरी शिवसेना संपणार नाही. कारण ही शिवसेना त्याग आणि बलिदानातून उभा राहिली आहे.

त्यामुळे रक्त सांडून उभा केलेली ही शिवसेना कधीच संपणार नाही असंही त्यांनी ही सांगितली. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, काही लोकं आता वडिलही चोरले जात आहेत.

त्यावर संजय राऊत म्हणाले की, लोकं वडिल चोरू शकत नाहीत, ज्या प्रमाणे देवाच्या मूर्ती चोर लोक चोरतात तेव्हा ती लोकं त्या मुर्तीची मंदिर नाही बनवत तर ती लोकं ती देवाची मूर्ती विकत असतात असंही त्यांनी यावेळी सांगितले.

संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे उदाहरण देताना म्हणाले की, एकदा बाळासाहेब ठाकरे यांनी पाण्यात दगड फेकला मात्र तो दगड बुडू लागला.

त्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी विचारले की, ते दगड का बुडत आहेत. त्यावर तिथे उपस्थित असलेल्या अतिशहाणा संजय राऊत यांनी उत्तर दिले की, तो दगड बुडत आहे कारण, त्या दगडाने बाळासाहेब ठाकरे यांचा हात सोडला आहे.

त्यामुळे ज्या चाळीस दगडांनी बाळासाहेब ठाकरे यांचा हात सोडला आहेत, ते गाळत रुतल्याशिवाय राहणार नाहीत असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

Non Stop LIVE Update
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ.
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.