AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना दिलासा नाहीच, पोलीस कोठडीतील मुक्काम दोन दिवसाने वाढला

Guniratna Sadavarte: एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना आजही दिलासा मिळू शकला नाही. सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सदावर्ते यांना 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत राहावं लागणार आहे.

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना दिलासा नाहीच, पोलीस कोठडीतील मुक्काम दोन दिवसाने वाढला
गुणरत्न सदावर्तेंना दिलासा नाहीच, पोलीस कोठडीतील मुक्काम दोन दिवसाने वाढलाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 6:22 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या निवासस्थावर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी दिल्या प्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (gunratna sadavarte) यांना आजही दिलासा मिळू शकला नाही. दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर सदावर्ते यांना आज कोर्टात हजर करण्यात आले. सदावर्ते यांच्या जामिनावर कोर्टात तब्बल तीन तास युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर आज अखेर सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसाची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सदावर्ते यांना 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत राहावं लागणार आहे. सदावर्ते यांच्यावर हल्लेखोरांना चिथावणी दिल्याचा आणि हल्ल्याचं षडयंत्र रचण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान, सदावर्ते यांना एका प्रकरणात ताब्यात घेण्यासाठी सातारा पोलीस (satara police) आले होते. मात्र, सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत वाढ झाल्याने सातारा पोलिसांना त्यांचा ताबा मिळू शकला नाही.

गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांची कोठडी संपली होती. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर सरकारी वकील प्रदीप घरत आणि सदावर्तेंचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी कोर्टात युक्तिवाद केला. तब्बल तीन तास हा युक्तिवाद झाला. यावेळी पोलिसांनी सदावर्तेंच्या 11 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानंतर कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून निकालाचे वाचन केले आणि सदावर्ते यांना 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

1 कोटी 80 लाख रुपये कुठे गेले?

त्यानंतर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मीडियाशी संवाद साधला. न्यायालयात बरीच प्रगती दिसली. सदावर्तेंच्या सीडीआर रिपोर्टमध्ये बरीच माहिती मिळाली. कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले. त्याने प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून 550 रुपये घेतल्याचे उघड झालं आहे. साक्षीदारांनीच तशी कबुली दिली आहे. म्हणजे त्याने 1 कोटी 80 लाख रुपये त्याने जमा केले. हे पैसे कुठे गेले. त्याचे वाटेकरी कोण आहे. ते कुणाच्या तरी वाट्याला गेले त्याबाबतही पोलिसांना तपास करायचं आहे, असं घरत यांनी सांगितलं.

नागपूरचा कॉल कुणाचा? तपास करणार

सीडीआर तपासल्यानंतर सदावर्तेंना नागपूरचा एक कॉल दिसतोय. ती व्यक्ती कोण आहे. त्याने मेसेज का केला. याचा तपास पोलीस करणार आहेत. ती जी व्यक्ती हे नाव कळलं होतं. ती व्यक्ती कोण हे चेहरेपट्टी झाल्यावरच कळेल. ती व्यक्ती कोर्टात आली तर बरं होईल, असंही ते म्हणाले.

इतर आरोपींबाबत उद्या सुनावणी

पहिले पंधरा दिवस आहे, त्या पंधरा दिवसात कोर्टाचं पूर्ण समाधान करून तपासाची कारणे सांगितली तर न्यायालय आम्हाला सदावर्तेंची कोठडी कोठडी वाढवून देईल. उद्या दुसऱ्या आरोपींना तळोजा तुरुंगातून कोर्टात आणलं जाईल. त्यानंतर त्यांच्या न्यायालयीन कोठडीवर निर्णय होईल, असं त्यांनी सांगितलं.

म्हणून सातारा पोलीस आले

माझ्या ऐकिव माहितीनुसार सदावर्ते यांनी समाजा समाजात विद्वेष पसरवणारं भाषण केलं होतं. त्यामुळे त्यांच्याविरोधात कुणी तरी साताऱ्यात गुन्हा दाखल केला आहे. सातारा पोलिसांनी त्यांना नोटीस दिली होती. पण ते आले नव्हते. नोटीस पीरियड संपल्याने सातारा पोलीस त्यांच्या अटकेची मागणी करण्यासाठी आले होते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

Maharashtra News Live Update : दिलासा नाहीच! सोमय्यांचा जामीन अर्ज फेटाळला, अटक होणार?

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, INS Vikrant प्रकरणात अडचणी वाढल्या

MNS vs Shivsena : आम्ही पक्ष कुणाच्या दाढीला बांधलेला नाही, मनसे आमदाराचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.