मुकेश अंबानी यांची आई कोकिला बेन यांची संपत्ती किती? शार्क टँकच्या जजेसला विकत घेऊ शकतात इतकी…

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या कार्यक्रमांना कोकिलाबेन नेहमी उपस्थित राहतात. कोकिलाबेन अंबानी यांच्याबद्दल अनेक जणांना माहिती नसेल. तर चला मग त्यांच्याबद्दल जरा जाणून घेऊयात.

मुकेश अंबानी यांची आई कोकिला बेन यांची संपत्ती किती? शार्क टँकच्या जजेसला विकत घेऊ शकतात इतकी...
kokilaben ambani net worth
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 4:03 PM

मुंबई : भारतात आज धीरूभाई अंबानी हे नाव मोजक्या लोकांना कदाचित माहित नसेल. पण हे नाव आता जगभरात ओळखलं जातं. अंबानी कुटुंबियांची संपत्ती पाहून अनेकांचा डोळे उंचावतात. रिलायन्स इंडस्ट्रीजचा भारतीय अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे. 6 जुलै 2002 रोजी धीरुभाई अंबानी यांच्या निधनानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजची कमान त्यांची मुले मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्याकडे गेली. या दोन्ही भावांची संपत्ती सगळ्यांना माहितच आहे. पण कदाचित तुम्हाला धीरुभाई अंबानी यांची पत्नी आणि मुकेश व अनिल अंबानी यांची आई कोकिलाबेन अंबानी यांची संपत्ती माहित नसेल.

कोकिलाबेन अंबानी यांचं 21 व्या वर्षी धीरूभाई अंबानी यांच्यासोबत विवाह झाला. कोकिलाबेन अंबानी यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1934 रोजी गुजरातमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लग्नानंतर त्या धीरुभाई यांच्यासोबत मुंबईला राहायला गेले. नंतर या जोडप्याने मुकेश अंबानी, अनिल अंबानी, दीप्ती साळगावकर आणि नीना कोठारी या चार मुलांना जन्म दिला.

इंग्रजी शिकण्यासाठी प्रोत्साहन

कोकिलाबेन अंबानी यांचे वडील टेलिग्राफ ऑफिसमध्ये काम करायचे. त्यांनी मॅट्रिक (दहावी) पर्यंत शिक्षण घेतले. पण नंतर धीरुभाई अंबानी यांच्याशी लग्न झाल्यानंतर कोकिलाबेन यांच्या जीवनावर शिक्षणाचा मोठा प्रभाव पडला, ज्यांनी त्यांना इंग्रजी शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले जेणेकरून ते त्यांच्या कंपनीच्या सभा आणि कार्यक्रमांना उपस्थित राहू शकतील.

भारतातील बहुतेक हिंदूंप्रमाणे, कोकिलाबेन अंबानी देखील सुरुवातीपासूनच शाकाहारी आहेत. त्यांच्या घरामध्ये मांस संबंधित उत्पादनांना परवानगी नाही आणि कोकिलाबेन या नियमांबाबत अत्यंत कठोर आहेत. कोकिलाबेन यांना रोटी, डाळ आणि ढोकळी आवडते.

प्रत्येक लक्झरी ब्रँडची कार

कोकिलाबेन अंबानी यांच्याकडे जगातील जवळपास प्रत्येक लक्झरी ब्रँडची प्रत्येकी एक कार आहे. त्यांच्या गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या सर्व आलिशान गाड्यांपैकी मर्सिडीज-बेंझ ही कोकिलाबेन अंबानींची आवडती कार आहे. एकदा एका थ्रोबॅक मुलाखतीत कोकिलाबेन अंबानी यांनी कबूल केले होते की जामनगरमध्ये असताना त्यांनी कधीही कार पाहिली नव्हती.

कोकिलाबेन अंबानी यांना देखील प्रवास करायला आवडतो. वयाच्या ८९ व्या वर्षी आजही त्या वेगवेगळ्या स्थळी प्रवास करत असतात. कोकिलाबेन यांना लंडन आणि स्वित्झर्लंडमध्ये वेळ घालवायला आवडते. धीरूभाई अंबानी हयात असताना, ते आणि कोकिलाबेन वर्षातून दोनदा प्रवास करायचे, कारण दोघांनाही फिरायला आवडायचे.

धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यातील भांडण सर्वांनाच माहिती आहे.पण जेव्हा यावरुन बाहेर चर्चा होऊ लागल्या तेव्हा कोकिलाबेन अंबानी यांनी सूत्र हाती घेतली आणि दोघांना एकत्र घेऊन पत्रकार परिषद घेत दोघं भाऊ एकत्र असल्याचं सांगितलं होतं.

कोकिलाबेन अंबानी यांची एकूण संपत्ती किती?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोकिलाबेन अंबानी यांची एकूण संपत्ती सुमारे रु. 18,000 कोटी आहे. त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहेत. त्यामुळे जर शार्क टँक इंडियाच्या सर्व जजेसची संपत्ती पाहिली तर त्या पेक्षा ही कोकिलाबेन यांची संपत्ती अधिक आहे.

शार्क टँक इंडियाच्या जजेस बाबत बोलायचं झालं तर SUGAR कॉस्मेटिक्च्या विनिता सिंह यांची एकूण संपत्ती 300 कोटी रुपये आहे.

Emcure फार्मास्युटिकल्सच्या कार्यकारी संचालक नमिता थापर यांची संपत्ती 600 कोटी रुपये आहे.

CarDekho.com चे सह-संस्थापक आणि CEO अमित जैन यांची एकूण संपत्ती 2900 कोटी रुपये आहे.

boAt चे सह-संस्थापक आणि CMO अमन गुप्ता यांची एकूण संपत्ती 700 कोटी रुपये आहे.

shaadi.com आणि makaan.com चे प्रमुख अनुपम मित्तल यांची एकूण संपत्ती 185 कोटी रुपये आहे.

Lenskart.com चे CEO पीयूष बन्सल यांची एकूण संपत्ती 600 कोटी रुपये आहे.

या सर्व जजेसची संपत्ती पाहता त्यांची सर्वांची संपत्ती जरी एकत्र केली तरी ती 5,285 कोटी रुपये होते. तर कोकिलाबेन यांची संपत्ती 18000 कोटी रुपये आहे.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.