मुंबईत भाजप आणि काँग्रेस आमने सामने, पेगाससच्या मुद्यावरुन काँग्रेसचं आंदोलन, भाजप नेत्यांचा ठिय्या
भाजप नेते प्रसाद लाड आक्रमक झाले आहेत. मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांसह प्रसाद लाड काँग्रेसच्या कार्यालयाकडे निघाले होते. पोलिसांनी भाजपचा मोर्चा अडवला आहे. मुंबईत भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस विरोधात आक्रमक झाले आहेत.
मुंबई : भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) आक्रमक झाले आहेत. मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांसह प्रसाद लाड काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या दिशेनं निघाले होते. पोलिसांनी भाजपचा मोर्चा अडवला आहे. मुंबईत भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस (Congress) विरोधात आक्रमक झाले आहेत. भाजपवर (BJP) कुणी गुंडशाहीनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं पद्धतीनं उत्तर देऊ, आम्ही संघर्ष करणारी लोक आहोत. आम्हाला धमक्या देऊ नका, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला. काँग्रेस भाजपच्या वसंत स्मृतीवर हल्ला करत असाल तर आम्ही उत्तर देऊ, पोलिसांच्या विनंती मुळं थांबत आहोत. पोलिसांनी काँग्रेसच्या आंदोलक कार्यकत्यांना अटक केली नाही तर आम्ही येथून पुढं जाऊ, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला आहे. काँग्रेसनं पेगाससच्या मुद्यावर भाजप विरोधात आंदोलन सुरु केलं आहे.
पाहा व्हिडीओ:
युथ काँग्रेसचं पेगासस वरुन आंदोलन
काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नेतृत्त्वात यूथ काँग्रेसकडून भाजपच्या कार्यालयावर पेगाससच्या मुद्यावर आंदोलन करण्यात येत आहे. पोलिसांनी यूथ काँग्रेसचा मोर्चा अडवण्यात आला आहे. पेगाससच्या माध्यमातून देशातील कोणत्याही व्यक्तीची हेरगिरी केली जात आहे. राहुल गांधी, यांच्यासह देशातील विरोधी पक्षातील नेत्यांची हेरगिरी करण्यात आली. पेगाससच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी झिशान सिद्दीकी यांच्या नेतृत्त्वात यूथ काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आहे. झिशान सिद्दीकी यांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटलं?
भाजपचे कार्यकर्ते बौद्धिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या अशा प्रकारांना सामोरं जाण्यास तयार असल्याचं चंद्रकातं पाटील म्हणाले.
झिशान सिद्दीकी यांना ताब्यात घेतल्यानंतर भाजपचे माघारी संकेत
मुंबईतील भाजपचे नेते मंगलप्रबात लोढा यांनी काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलन मागं घेण्याचे संकेत दिले आहेत.
पोलिसांच्या सतर्कतेनं वाद टळला
भाजप आमदार प्रसाद लाड आणि मंगल प्रभात लोढा यांच्यासह भाजप कार्यकर्ते मुंबईतील कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन ऐकण्यासाठी जमले होते. काँग्रेस कार्यकर्ते कार्यालयाच्या दिशेनं आंदोलन करण्यासाठी येत असल्याच समजताच भाजप नेते आणि कार्यकर्ते काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दिशेनं चालले होते. पोलिसांनी रस्त्यावर उतरुन भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रोखण्यात यश मिळवलं. पोलिसांनी आता मंगल प्रभात लोढा यांना देखील ताबा्यात घेण्यात आलं आहे.
इतर बातम्या:
MNS : मनसेची महत्त्वाची बैठक, राज ठाकरेंच्या उपस्थितीत महापालिका निवडणुकीची रणनिती ठरणार
Rupali Patil | ‘Hindustani Bhauसारख्यांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढला पाहिजे’