Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai AC Local : मुंबईच्या सर्व लोकल एसी होण्याची शक्यता, असंख्य लोकल प्रवाशांना लवकरच मोठं गिफ्ट?

Mumbai AC Local Train : फक्त मुंबईच नव्हे तर येत्या काळात मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली या पालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Mumbai AC Local : मुंबईच्या सर्व लोकल एसी होण्याची शक्यता, असंख्य लोकल प्रवाशांना लवकरच मोठं गिफ्ट?
मुंबई एसी लोकल...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 7:59 AM

मुंबई : मुंबई लोकल (Mumbai Local News) बाबत लवकरच मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. उपनगरीय रेल्वे वातानुकूलित करण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती मिळतेय. यासाठी 20 हजार कोटींच्या प्रस्तावाला केंद्र सरकार (Centre Government) मंजुरी देण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जातंय. राजकीय घडामोडीनंतर महाराष्ट्रात भाजपकडून जोरदार हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुंबईकरांना केंद्राकडून मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. उपनगरी रेल्वे वातानुकूलित (Mumbai AC Local News) करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय अर्थ मंत्रालय मान्यता देण्याची शक्यता असल्याची चर्चा रंगली आहे. फक्त मुंबईच नव्हे तर येत्या काळात मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली या पालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलंय.

लोकल प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट

गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वाऱ्यांचे वेग प्रचंड आहे. अशातच भाजपला पुन्हा महाराष्ट्रात सत्ता काबीज करण्यात यश आलं आहे. राज्यसभा निवडणुकीतला विजय, त्यानंतर विधानस परिषदेही भरघोस मतं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकारला दणका देण्यात भाजपला यश आलं आहे. आता यानंतर पालिका निवडणुकाही लवकरच होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुंबईसह आसपासच्या परिसरातून लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सांगितलं जातंय.

संपूर्ण लोकल सेवा एसी होणार?

टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई उपनगरीय रेल्वे संपूर्ण एसी करण्याच्या 20 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला प्राधान्य द्या, असे आदेश पीएमओकडून देण्यात आले आहे. त्यासाठी लवकरच आता केंद्रीय अर्थमंत्रालयाकडूनही मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. मुंबईतील एसी लोकलचा तिकीट दर महिन्याभरापूर्वीच कमी करण्यात आला होता. तिकीट दर जरी कमी केला असला, तरी मासिक पासच्या दरात बदल करण्यात आलेला नव्हता. मात्र एसी लोकलच्या तिकीट दरात कपात केल्यापासून पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलप्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, हार्बर मार्गावरील एसी लोकलला फारसा प्रतिसाद नसल्याचंही दिसून आलं होतं. त्यामुळे हार्बर मार्गावरील एसी लोकलसेवा बंद करुन ती मध्य मार्गावर वळवण्यात आली होती. येत्या काळात एसी लोकलच्या प्रवासाला प्रवासी अधिक पसंती देतील, असा विश्वास रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त केला जातोय. आता खरंत मुंबईतील संपूर्ण लोकलसेवा एसी होते का, याकडे लोकल प्रवाशांचं लक्ष लागलंय.

उरण-खारकोपर सेवाही लवकरच

त्याचप्रमाणे, बेलापूर- खारकोपर- उरण या मध्य रेल्वे मार्गावरील चौथ्या रेल्वे मार्गाचे काम 90 टक्के पूर्ण झालंय. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे येत्या दोन महिन्यात या मार्गाचंही लोकार्पण लवकरच केलं जाईल, असंही सांगितलं जातंय.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.