मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीची निवडणूक 31 ऑगस्टला, अजित पवारांच्या निर्देशाने सभापतीची निश्चिती

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीची निवडणूक कोरोनामुळे लांबणीवर पडली (Mumbai Agricultural Product Market Committee Chairman Election) होती. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीची निवडणूक 31 ऑगस्टला, अजित पवारांच्या निर्देशाने सभापतीची निश्चिती
Follow us
| Updated on: Aug 22, 2020 | 12:12 AM

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीची निवडणूक कोरोनामुळे लांबणीवर पडली होती.  येत्या 31 ऑगस्टला ही निवडणूक होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशाने सभापती निश्चित होणार आहे. या निवडणुकीची सूत्र आमदार आणि संचालक शशिकांत शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकासआघाडीचा एकतर्फी विजय झाला होता. या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आल्या होत्या. (Mumbai Agricultural Product Market Committee Chairman Election)

या सभापती पदासाठी तीन संचालक इच्छूक होते. यात पुणे कोट्यातून निवडून आलेले माजी सभापती बाळासाहेब सोलस्कर यांचे नाव आघाडीवर आहे. तर नागपुरातील संचालकदेखील यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकासआघाडीने आपले वर्चस्व राखले आहे. यात 18 पैकी 16 संचालक राष्ट्रवादीचे आहेत. एक शिवसेना आणि एक बंडखोर शिवसेना तर 4 काँग्रेस आणि 8 राष्ट्रवादीशी निगडित निवडून आले आहेत. भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावूनही एकही जागा जिंकलेली नाही.

फळ मार्केटचे संजय पानसरे बिनविरोध निवडून आले आहेत. तर कामगार प्रतिनिधी म्हणून शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. त्याशिवाय 6 महसूल आणि 4 व्यापारी मतदारसंघात हे संचालक निवडण्यात आले आहेत. राज्यातील महाविकासआघाडीचा प्रयोग एपीएमसीमध्येही यशस्वी झाला आहे.

महसूल विभाग विजयी उमेदवार

  • अमरावती : प्रवीण देशमुख (महाविकासआघाडी) माधवराव जाधव (महाविकासआघाडी)
  • कोकण विभाग : प्रभु पाटील (अपक्ष) राजेंद्र पाटील (महाविकासआघाडी)
  • पुणे विभाग : बाळासाहेब सोलस्कर (महाविकासआघाडी) धनंजय वाडकर (महाविकास आघाडी)
  • नागपूर विभाग : हुकूमचंद आमधरे (महाविकासआघाडी) सुधीर कोठारी (महाविकासआघाडी)
  • नाशिक विभाग : जयदत्त होळकर (महाविकासआघाडी) अद्वैत हिरे (अपक्ष)
  • औरंगाबाद : वैजनाथ शिंदे (महाविकासआघाडी) अशोक डक (महाविकासआघाडी)
  • कांदा बटाटा मार्केट : अशोक वाळुंज (महाविकासआघाडी)
  • भाजीपाला मार्केट : शंकर पिंगळे (अपक्ष )
  • दाणा मार्केट : निलेश विरा (अपक्ष)
  • मसाला मार्केट : विजय भुता (अपक्ष)
  • माथाडी मतदार संघ : शशिकांत शिंदे (महाविकास आघाडी)
  • फळ मार्केट : संजय पानसरे – बिनविरोध (महाविकास आघाडी)

या निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि शेकाप यांनी आपले पॅनल बनवले होते. सहकार पणन निगडीत या बाजार समितीमध्ये रबरी शिक्का असलेला सभापती निवडण्याची परंपरा अबाधित राहणार आहे. पुणे कोट्यातून निवडून आलेले माजी सभापती बाळासाहेब सोलस्कर यांचे नाव आघाडीवर असून नागपूर येथील संचालक देखील प्रयत्नशील आहेत. तीन संचालक या सभापतीपदासाठी इच्छूक आहेत.

या सर्व 6 महसूल विभागांमध्ये एकूण 58 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 6 महसूल आणि 4 व्यापारी अशा एकूण 10 मतदारसंघाची निवडणूक 29 फेब्रुवारी रोजी पार पडली होती. यात एकूण 93.72 टक्के मतदान झाले होते. (Mumbai Agricultural Product Market Committee Chairman Election)

संबंधित बातम्या : 

Election | पाच जणात प्रचार, ऑनलाईन अर्ज, ‘कोव्हिड’ काळात निवडणुकांसाठी आयोगाच्या मार्गदर्शक सूचना

“बंद करा ती कॉलर ट्यून” ‘कोरोना’च्या ट्यूनने बाळा नांदगावकर वैतागले

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.