AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानावर मधमाश्यांचा हल्ला, वेळापत्रक विस्कळीत

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अकासा एअरच्या दिल्लीच्या विमानावर मधमाशांनी हल्ला केला. सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. विमानतळाच्या त्वरित प्रतिसाद दलाने मधमाश्यांना काढून टाकले.

मोठी बातमी! मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानावर मधमाश्यांचा हल्ला, वेळापत्रक विस्कळीत
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 09, 2025 | 12:26 PM
Share

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज मंगळवार (९ एप्रिल) एक धक्कादायक घटना घडली आहे. अकासा एअरच्या मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानावर मधमाशांनी हल्ला केला. यावेळी मधमाश्यांच्या एका मोठ्या थव्याने विमानावर हल्ला चढवला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. विमानतळावरील क्विक रिस्पॉन्स टीमने तातडीने कार्यवाही केली. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.

नेमकं काय घडलं?

अकासा एअरचे मुंबईहून दिल्लीला जाणारे विमान बे नंबर A1 वर थांबले होते. याच दरम्यान अचानक मोठ्या संख्येने मधमाश्या जमा होऊ लागल्या. काही क्षणातच संपूर्ण विमानाला मधमाश्यांनी वेढले. यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. यानंतर विमानतळावरील क्वीक रिस्पॉन्स टीमला घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या टीमने सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा वापर करून मधमाशांना विमानापासून हटवले. त्यांच्या या त्वरित प्रतिसादाने मोठा अनर्थ टळला.

या घटनेमुळे विमानाचे वेळापत्रक विस्कळीत झाले. मधमाश्यांचा हल्ल्यानंतर प्रशासनाने आवश्यक तपासणी केल्या. या तपासणीनंतर या विमानाला दिल्लीकडे प्रस्थान करण्याची परवानगी मिळाली. या घटनेत कोणतीही व्यक्ती जखमी झालेली नाही, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.

विमानतळ प्रशासनाकडून गंभीर दखल

दरम्यान, विमानतळ प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. हा मधमाशांचा थवा कसा आणि कुठून आला, याबद्दल सखोल चौकशी सुरू केली आहे. हवामान बदल, विमानांचा गोंगाट किंवा प्रकाशातील बदलांमुळे या अशा घटना घडू शकतात का, याचाही अभ्यास केला जाणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.