पुण्यातच उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश

Ajit Pawar Supporter Sanjog Waghere inter in Shivsena Uddhav Thackeray Group : पुण्यातच उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. अजितदादांच्या समर्थकांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी अनेक कार्यकर्ते वाघेरे यांच्यासोबत होते. उद्धव ठाकरे यावेळी काय म्हणाले? वाचा...

पुण्यातच उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना मोठा धक्का; 'या' बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश
Follow us
| Updated on: Dec 30, 2023 | 2:04 PM

दिनेश दुखंडे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 30 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यातच अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अजितदादांच्या समर्थक नेत्याने शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. अजित पवार यांचे खंदे समर्थक संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मुंबईतील ‘मातोश्री’ या ठाकरे यांच्या निवासस्थानी वाघेरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन हाती बांधून घेतलं. हजारो समर्थांसह वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह इतरही नेते उपस्थित आहेत.

शिवबंधन बांधल्यानंतर वाघेरे म्हणाले…

अजित पवार यांचे खंदे समर्थक संजोग वाघेरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी वाघेरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला आपण पक्षात प्रवेश दिला. त्याबद्दल मी उद्धव साहेबांचे आभार मानतो. मी शब्द देतो की, येत्या काळात मी पक्षाच्या प्रसारासाठी मी प्रयत्न करत राहील. लोकांच्या सेवेसाठी कायम उपलब्ध असतो. हे काम पुढे घेऊन जाण्याचं काम मी करेन, असं वाघेरे म्हणाले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी संजोग वाघेरे आणि त्यांच्या समर्थकांचं पक्षात स्वागत केलं. मातोश्रीत आलेल्या शिवसेनेच्या सर्व वाघांचं स्वागत करतो. वाघेरे म्हणाले, की ते मला भेटल्यावर भावून झाले. पण हा काळ असा आहे की, जे भावूक आहेत. निष्ठावंत आहेत. ते लोक भगव्यासोबत आहेत. माझ्यासोबत आहेत. जे खाऊक आहेत त्यांना खोक्यात घालायचं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी वाघेरे यांचं स्वागत करत असतानाच शिंदे गटाला टोला लगावला आहे.

मी शब्द दिला होता, म्हणून जे आत्ता गद्दार झाले आहेत त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी सत्ता हिसकावून घेतली. आमच्याकडे सत्ता नसताना देखील इकडे तुम्ही जिद्दीने सोबत आलात. तिथल्या कार्यकर्त्यांनी शब्द दिला आहे की, तुम्ही द्याल तो उमेदवार… आम्हाला इंडिया आघाडीला विचारतात तुमच्याकडे चेहरा कोण आहे. आमच्या कडे अनेक चेहरे आहेत, तुमच्याकडे कोण आहे? जे आहेत त्यांना आपण पाहतोय 10 वर्ष त्यांनी काय केलं आहे, असं ठाकरे म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.