पक्ष आला, चिन्ह आलं, आता नवं…; ‘राष्ट्रवादी’बाबत अमोल मिटकरी यांची मोठी घोषणा
Amol Mitkari on Election Commission Decision about NCP Symbol and Name Ajit Pawar : पक्ष अन् चिन्ह आल्यानंतर राष्ट्रवादीत मोठा बदल... आमदार अमोल मिटकरी यांची मोठी घोषणा... टीव्ही 9 मराठीशी बोलताना अमोल मिटकरी यांनी नेमकं काय म्हटलं, कोणती घोषणा केली? वाचा...
गिरीश गायकवाड, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, मुंबई | 07 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर आता आणखी एक नवी गोष्ट समोर येणार आहे. राष्ट्रवादीचे नेते, विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी ही घोषणा केली आहे. पक्षचिन्ह आम्हाला दिलेलं आहे. पक्षाचं नाव देखील आमच्याकडे आहे. त्यामुळे घड्याळ तेच आहे… फक्त वेळ नवी असणार आहे आणि हाच आमचा नवीन नारा आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले. एक नवीन गाणं आम्ही या निमित्ताने तयार केलेलं आहे. ‘घड्याळ तेच वेळ नवी’ असं या गाण्याचं शीर्षक आहे. अजितदादांच्या परवानगीने लवकरच हे गाणे आम्ही लॉन्च करू, असं अमोल मिटकरी यांनी सांगितलं आहे.
वेळ पडली तर पक्षकार्यालयाचा ताबा घेऊ- मिटकरी
राज्य सरकारने निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे. त्यानुसार पक्षाचे कार्यालय ताब्यात घ्यायचे की नाही याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. अजित दादा जे सांगतील त्याप्रमाणे पुढील दिशा ठरवली जाईल. पक्षाचा कार्यालय वेळ पडली तर आम्ही ताब्यात घेऊ. त्यामध्ये कुठलेही दुमत नाहीये, असंही अमोल मिटकरी म्हणाले.
राऊत आव्हाडांवर टीकास्त्र
काही उपटसुंबांना कामधंदे राहिलेले नाहीये. संजय राऊत म्हणा किंवा मुंब्राच्या भाई म्हणा… या सगळ्यांना कुठलेही कामधंदे राहिलेले नाहीयेत. त्यामुळे त्यांना काय बडबड करायची ते करू द्या. आमच्याकडे 50 आमदार आहेत. येत्या काळामध्ये आमचे आमदारांची संख्या अजून जास्त वाढेल. जे उरले सुरलेले आमदार आणि खासदार आहेत ते देखील आमच्याकडे येतील, असं अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.
अमोल कोल्हेंबाबत मिटकरी काय म्हणाले?
कमल आधीच राष्ट्रवादीत आहेत आणि आता दुसरा अमोल सुद्धा येणार आहे मी यापूर्वी म्हटलं होतं की अमोल कोल्हे यांनी प्रतिज्ञापत्र म्हटलेलं आहे की मी राष्ट्रवादी सोबत आहे. त्यामुळे आता आमच्याकडे आमच्याकडे पक्षाची आणि नाव आहे. त्यामुळे अमोल कोल्हे हे अधिकृतरित्या आमच्याकडे आहेत, असं म्हटलं तर गैर ठरणार नाही, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी अमोल कोल्हे यांच्या भूमिकेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
शरद पवार गटातील सहा नेते आता लवकरच आमच्याकडे येतील. काही जणांसाठी मंत्रिपद सुद्धा रिक्त ठेवण्यात आलेली आहेत. जेव्हा ते येतील त्यावेळी एक मोठा गोष्ट पुन्हा महाराष्ट्र पाहणार आहे, असं मोठा दावा अमोल मिटकरींनी केला आहे.