अमिता- अशोक चव्हाण यांची ‘तेरे घर के सामने’ लव्हस्टोरी; कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये भेट अन् मग…

Ashok Chavan And Amita Chavan Lovestory : राजकीय जीवनात एका वेगळ्या उंचीवर असणारा आणि राज्याच्या राजकारणवर पकड असणारा नेता म्हणजे अशोक चव्हाण... पण अशोक चव्हाण हे पर्सनल लाईफमध्ये कसे आहेत? अमिता- अशोक चव्हाण यांची 'तेरे घर के सामने' लव्हस्टोरी काय आहे? वाचा

अमिता- अशोक चव्हाण यांची 'तेरे घर के सामने' लव्हस्टोरी; कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये भेट अन् मग...
Follow us
| Updated on: Feb 14, 2024 | 8:19 AM

मुंबई | 14 फेब्रुवारी 2024 : आज व्हॅलेंटाईन डे… प्रेमाचा दिवस… आपल्या प्रिय व्यक्तीसोबत सेलिब्रेट करण्याचा दिवस… यानिमित्त राज्याचे माजी मुख्यमंत्री, भाजपचे नेते अशोक चव्हाण यांची ‘तेरे घर के सामने’ लव्हस्टोरी जाणून घेऊयात… राजकारणी व्यक्ती म्हटलं की धीर-गंभीर व्यक्तीमत्व डोळ्यासमोर उभं राहतं. त्यामुळे यांचं पर्सनल लाईफ कसं असेल असा अनेकांना प्रश्न असतो. पण काही राजकारणी याला अपवाद असतात. अशोक चव्हाण यांच्या वैवाहिक जीवनाकडे पाहिलं की त्याचा प्रत्यय येतो. अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांची लव्हस्टोरी फिल्मी आहे. हे दोघे पहिल्यांदा कॉलेजमध्ये भेटले. मग भेटीगाठी वाढत गेल्या. प्रेम झालं अन् मग घरच्यांच्या परवानगीने दोघांनी लग्नगाठ बांधली.

अमिता- अशोक चव्हाण यांची पहिली भेट

अशोक चव्हाण ज्या कॉलेजमध्ये शिकायचे त्या कॉलेजमध्ये अमिता यांची एक मैत्रिण शिकत होती. कॉलेजचं गॅदरिंग होतं. तेव्हा या मैत्रिणीने अमिता यांना अशोक चव्हाणांच्या कॉलेजला बोलावलं. तेव्हा तिनं सांगितलं की, हा मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे… तेव्हा अमिता यांनी अशोक चव्हाण यांना पाहिलंय.

‘तेरे घर के सामने’ लव्हस्टोरी

चव्हाण कुटुंब सह्याद्री बंगल्यावर राहत होतं. त्यांच्याच घरासमोर अमिता यांचं घर होतं. त्यामुळे घराची खिडकी उघडली की ते एकमेकांना दिसायचे.अमिता यांनी जेव्हा पहिल्यांदा अशोक चव्हाण यांना त्या घरा पाहिलं तेव्हा लक्षात आलं की हे इथे राहतात. त्यामुळे ‘तेरे घर के सामने’ अशी ही लव्हस्टोरी आहे.

शंकरराव चव्हाण यांना कळालं होतं तेव्हा…

अमिता आणि अशोक चव्हाण यांना वाटत होतं की या दोघांचं नातं कुणाला माहिती नाही. मात्र या दोघांची लव्हस्टोरी सगळ्यांना माहिती होती. जेव्हा घरी सांगण्याची वेळ आली. तोवर शंकरराव चव्हाण यांच्या कानावर ही गोष्ट गेली होती. दोघे कॉलेजमध्य एकत्र असतात, फिरतात. याची कल्पना शंकरराव चव्हाण यांना होती. घरातून आधी थोडा विरोध झाला पण नंतर त्यांनी नातं स्विकारलं. अमिता आणि अशोक चव्हाण यांच्या लग्नाला परवानगी दिली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.