मोठी बातमी : मुंबईतील दोन बड्या नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश; ठाकरे गटाला मोठा धक्का

Shivsena CM Eknath Shinde Group : मुंबईतील दोन बड्या नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश... शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. पक्ष प्रवेशावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं? वाचा सविस्तर...

मोठी बातमी : मुंबईतील दोन बड्या नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश; ठाकरे गटाला मोठा धक्का
Follow us
| Updated on: Dec 10, 2023 | 11:51 AM

मुंबई | 10 डिसेंबर 2023 : शिवसेनेच्या गोटातून मोठी बातमी… ठाकरे गटातील दोन बड्या नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. ठाकरे गटाचे घाटकोपर भटवाडीचे माजी नगरसेवक दीपक हांडे आणि सौ. अश्विनी हांडे यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. या पक्ष प्रवेशामुळे ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलं. तेव्हापासून ठाकरे गटाला रामराम करत अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता हांडे यांच्या पक्षप्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

ठाकरे गटाच्या नेत्यांचा शिवसेनत प्रवेश

ठाकरे गटाचे घाटकोपर भटवाडीच्या प्रभाग क्रमांक 128 चे माजी नगरसेवक दीपक हांडे आणि माजी नगरसेविका सौ.अश्विनी हांडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. मुख्यमंत्री शिंदे यांनी हांडे यांचं शिवसेना पक्षात स्वागत केलं. तसंच त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर, शिवसेना सचिव सुशांत शेलार आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

हांडे यांच्यासोबतच ठाकरे गटाच्या वसई-नालासोपारा महिला संपर्क प्रमुख भारती गावकर यांनीही शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यासोबतच उपशाखाप्रमुख राजूभाई शिर्सेकर, हसमुख महाराज रावल, रमाकांत झगडे, रोहित बोऱ्हाडे, अमोल गाढवे, राकेश बोढेकर, युवा सेना अधिकारी संतोष मोरे, चंद्रकांत कुंजीर आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचं शिवसेनेत स्वागत केलं. शिंदे बोलताना, मुंबई स्वच्छ आणि सुंदर व्हावी यासाठी संपूर्ण स्वच्छता अभियान हाती घेतले असून संपूर्ण शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावं, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. या मोहिमेत मी स्वतः सहभागी होत असून जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं. यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मुंबईतील रखडलेले पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय आम्ही घेतला असून त्याची अंमलबजावणी लवकरच होईल. घाटकोपर येथील भटवाडी परिसरातील अनेक विकासकामे प्रलंबित असल्याची मला पूर्ण कल्पना आहे. ही विकासकामे पूर्ण करण्यासाठी निधी कमी पडू दिले जाणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना दिला.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.