Pravin Darekar : आम्ही संजय राऊतांसारखे आक्रसताळे नाही, मात्र चौकशीच्या आड छळवाद सुरू-प्रवीण दरेकर

प्रवीण दरेकरांनी पुन्हा महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार निशाणा साधला आहे. मी पहिल्या दिवसांपासून सांगत आहे, आम्ही लोकशाही मानणारे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनधी आहोत. आम्ही संजय राऊतांसारखे आक्रसताळे नाही. त्यांना चौकशीला बोलावल्यावर काय नंगा नाच करतात ते आपण पाहिलं आहे. अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

Pravin Darekar : आम्ही संजय राऊतांसारखे आक्रसताळे नाही, मात्र चौकशीच्या आड छळवाद सुरू-प्रवीण दरेकर
पोलीस चौकशीनंतर प्रवीण दरेकरांची महाविकास आघाडीवर टीकाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 3:20 PM

मुंबई : भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची (Pravin Darekar) मुंबै बँक मजूर (Mumbai Bank Case) प्रकरणात आज पोलीस चौकशी पार पडली आहे. त्यावरून प्रवीण दरेकरांनी पुन्हा महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार निशाणा साधला आहे. मी पहिल्या दिवसांपासून सांगत आहे, आम्ही लोकशाही मानणारे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनधी आहोत. आम्ही संजय राऊतांसारखे आक्रसताळे नाही. त्यांना चौकशीला बोलावल्यावर काय नंगा नाच करतात ते आपण पाहिलं आहे. मी जेव्हा जेव्हा चौकशीला बोलवत आहेत, तेव्हा तेव्हा चौकशीला जात आहे. पण त्यांना पोलीस कस्टडी का हवी आहे. त्यांच्या नेत्यांवर ज्या कारवाई होतात. त्याला काऊंटर म्हणून आमच्यावर दबाव आणण्यासाठी हे सर्व सुरू आहे. जी माहिती अर्धा तासात देऊ शकतो त्यासाठी पुन्हा पुन्हा चौकशीला बोलवून तासंतास बसवून ठेवत आहेत. हा सुडाच्या भावनेतून छळवाद सुरू आहे. मात्र आम्ही कायद्याला प्रतिसाद देण्यास तयार आहोत. ज्या ज्या वेळी पोलिसांना सहकार्य लागेल तेव्हा सहकार्य करू, असे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत

सोमय्या पळून जाणेर नाहीत

तसेच किरीट सोमय्या सध्या कुठे आहेत असे विचारले असता ते म्हणाले, किरीट सोमय्या पळून जाणारा माणूस नाही. तो पळवणारा नेता आहे. त्यांची न्यायालयीन प्रोसिजर सुरू आहे. तो लपणारा नेता नाही, असे उत्तर त्यांनी दिले. सोमय्या हे देशाच्या बाहेर पळून जाऊ शकतात, अशी शंका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. तसेच विरोधकांच्या मनात देवेंद्र फडणवीस साहेबांचा एवढा मत्सर आहे की त्यामुळे यांना रोज देवेंद्र फडणवीस यांचं नावं घ्यावच लागतं. त्यामुळे रोज सकाळी फडणवीसांवर टीका करायची मोदी सरकारवर टीका करायची त्यांचा एकही दिवस जात यांच्यावर टीका केल्याशिवाय यांचा दिवस जात नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.

फोन टॅपिंग विनाकारण होत नाही

राज्यात सध्या आणखी एक प्रकरण चांगलचं गाजतंय. ते म्हणजे फोन टॅपिंग प्रकरण, राज्यत त्यावरून मोठा वादंग सुरू आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप केले असा आरोप सातत्याने होत आहे. यात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. त्यात आता महाविकास आघाडीतील नेत्यांचे जाबब नोंदवण्याच काम सुरू आहे. त्याबाबत दरेकरांना विचारले असता, फोन टॅपिंग हे विनाकारण होत नसते. त्यामुळे त्यातलं सत्य बाहेर येईलच. असेही प्रवीण दरेकर म्हणाले आहे.

Sadhvi Saraswati : काश्मीर फाईल थांबण्यासाठी तलवारी बाळगा, साध्वी सरस्वतींचे तरूणाईला आवाहन

Mallikarjuna Kharge: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची ईडीकडून चौकशी सुरू, नेमकं काय आहे प्रकरण?

JNU News : इकडे येचुरींना मुदतवाढ मिळाली अन् तिकडे हिंसा भडकली; अमित मालवीय यांनी सांगितलं JNU हिंसेचं कनेक्शन

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.