मुंबईकरांसाठी बेस्टचं ‘बेस्ट’ गिफ्ट! मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ होणार

ऑक्टोबर महिन्यापासून मुंबईकरांना बेस्टची खास सेवा मिळणार आहे. मुंबईकराचा प्रवास या ई-बाईकमुळे अधिक सुसज्ज होईल?

मुंबईकरांसाठी बेस्टचं 'बेस्ट' गिफ्ट! मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ होणार
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 7:31 AM

मुंबई : बेस्टकडून (Mumbai BEST) संपूर्ण मुंबईत ई-बाईक (e-Bike Service) सेवेची घोषणा करण्यात आली आहे. ई-बाईकची सेवा देणारा बेस्ट परिवहन उपक्रम भारतातील पहिला सार्वजनिक उपक्रम ठरणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये 180 बस थांब्यांवर 1 हजार ई-बाईक सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीय. या सेवेमुळे मुंबईकराचा प्रवास अधिक सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. या सेवेची सुरुवात मुंबईतल्या पश्चिम उपनगरातून होईल. सुरुवातीला मुंबईच्या पश्चिम उपगनरातील (Mumbai Western Suburb) अंधेरी, विलेपार्ले, जुहू, सांताक्रूझ, कार, वांद्रे, माहीम आणि दादर या भागात ई-बाईक सेवा सुरु केली जाणार आहे. त्यानंतर शहराच्या इतर भागातही त्याचा विस्तर केला जाणार आहे.

मुंबईकरांकडून या सेवेला नेमका कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जून 2023 पर्यंत या ई बाईकची संख्या 5 हजार पर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे. ही सेवा बेस्टच्या ऍपमधूनही घेता येऊ शकणार आहे. बेस्ट चलो ऍपच्या माध्यमातून ई-बाईक सेवेसाठीचा पर्यायही निवडता येऊ शकेल, असं बेस्टच्या वतीने सांगण्यात आलंय.

हे सुद्धा वाचा

ई बाईकच्या सेवेतून लोकांना ई बाईक स्टेशनच्या अंतर्गत पिक अप आणि ड्रॉप सुविधा उपलब्ध असेल. जून महिन्यापासून या सेवेसाठी प्रायोगिक तत्त्वावर मुंबईकरांकडून नोंदणी करुन घेण्यात आली होती. त्यात तब्बल 40 हजार लोकांनी नोंदणी केल्याची माहितीही समोर आलीय.

वोगो, या सेल्फ ड्राईव्ह मोबिलिटी कंपनीच्या साहाय्याने ई-बाईक सेवा बेस्ट सुरु करणार आहे. या सेवेसाठी सुरुवातीचा दर हा 20 रुपये असेल. तर पुढे प्रत्येक किलोमीटर मागे 23 रुपये दर आकारला जाईल. ताशी 25 किमीच्या वेगाने या ई-बाईक धावू शकतील, असं सांगण्यात आलंय.

ई-बाईक सेवेचा लाभ घेण्यासाठी बेस्ट बसचा पास या सेवेची जोडण्याचाही प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी स्पेशल ट्रॅव्हल पास मुंबईकरांना काढावा लागेल. या पासमुळे ई-बाईक सेवा आणि बेस्ट बसचा प्रवास एकत्रितरीत्या करता येईल. यामुळे मुंबईकरांना वेळही वाचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.