प्रसाद लाड यांचं निलंबन का नाही? ते तुमचे जावई आहेत का?; काँग्रेस आमदाराचा नीलम गोऱ्हेंना सवाल
Bhai Jagtap on Prasad Lad and Ambadas Danve Argument : काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी प्रसाद लाड आणि अंबादास दानवे यांच्यात झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी निलम गोऱ्हे यांना काही सवाल केले आहेत. टीव्ही 9 मराठीशी बोलताना भाई जगताप काय म्हणाले? वाचा...
विधान परिषदेत काल गोंधळ पाहायला मिळाला. भाजप आमदार प्रसाद लाड आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात वाद झाला. यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पुढच्या पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं. यावर काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी वरच्या सभागृहात आहे. मात्र तिथे प्रसाद लाड यांनी हातवारे करून बोलू लागले. त्याचं प्रतिउत्तर म्हणून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काही शब्द वापरले. प्रश्न निलंबनाचा नाही… मात्र हा दोघांचा वाद आहे त्याला निलंबित का केलं नाही? ते तुमचे जावई आहेत का?, असा सवाल भाई जगताप यांचा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना केला आहे.
नीलम गोऱ्हे पक्षपाती- जगताप
अंबादास दानवे यांनी माफी मागितली. मात्र प्रसाद लाड यांनी माफीही मागितली नाही. यामुळे हे सरकार आणि सभापती महोदय नीलम गोऱ्हे पक्षपातीपणाने वागत आहेत. सरकार हे पॉवर आणि अधिकाऱ्याच्या जोरावर सभागृहात ही दादागिरी करते ही योग्य नाही, असंही भाई जगताप म्हणाले.
काँग्रेस नेते, विधान परिषदेचे आमदार भाई जगताप आणि माजी विरोधी पक्षनेते रवी राजा बी.ई.एस.टी. व्यवस्थापकाला दिले आहे. मुंबईच्या साहिल परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होऊन स्थानिक नागरिकांना होणाऱ्या त्रास आणि स्मार्ट मिटर रद्द करण्याबाबत निवेदन दिले.
भाई जगताप यांचा थेट सवाल
अदानींचे स्मार्ट मीटर हे जनतेच्या खिशातून पैसे काढण्यासाठी स्मार्टआहेत. 2003 च्या कायद्यानुसार आम्हाला अधिकार दिलेला आहे. मात्र अदानी यांना ठेका देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि पालिका यांनी आमच्या डोक्यावरती हे मारलं आहे. नागपूरला प्रीपेड मीटर बंद केले. मग मुंबईत ही मीटर का लावले जातात? नागपूरला देवेंद्र फडणवीस आहेत. म्हणून न्याय आणि मग मुंबई वाऱ्यावर सोडली आहे का? आम्ही विरोधी आहोत आणि यासाठी लढा उभा करणार आहोत. आता अधिकाऱ्यांना आम्ही संधी दिली आहे यापुढे आम्ही आंदोलन करणार आहोत, असं भाई जगताप म्हणाले.