काँग्रेसचं है तयार हम अभियान नेमकं कशासाठी?; भाजपचं एक ट्विट अन् काँग्रेसला पाच सवाल…

BJP Tweet About Cogress Anniversary Rally in Nagpur : आज काँग्रेसचा 139 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त नागपुरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावर भाजपकडून टीका करण्यात आली आहे. एक ट्विट करत भाजपने काँग्रेसला पाच परखड सवाल केलेत. हे सवाल काय आहेत? वाचा...

काँग्रेसचं है तयार हम अभियान नेमकं कशासाठी?; भाजपचं एक ट्विट अन् काँग्रेसला पाच सवाल...
Follow us
| Updated on: Dec 28, 2023 | 11:57 AM

मुंबई | 28 डिसेंबर 2023 : काँग्रेस पक्षाचा 139 वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त नागपुरात काँग्रेसकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावर भाजपकडून टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्र भाजकडून ट्विट करत टीका करण्यात आली आहे. तसंच भाजपने काँग्रेसला पाच सवाल विचारलेत. भाजपने एक पोस्टर शेअर केलंय. पुन्हा हारण्यासाठी तुमचं स्वागत आहे…, असं या ट्विटमध्ये म्हणण्यात आलंय. मोहब्बत करप्शन की दुकान खोलने के लिए स्वागत है आपका… काँग्रेस वर्धापन दिन नागपूर…, असं या पोस्टरवर म्हणण्यात आलं आहे. काँग्रेसचं है तयार हम अभियान नेमकं कशासाठी?, असा सवाल भाजपने काँग्रेसला केला आहे. भाजपचे ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसला थेट पाच सवाल विचारले आहेत. नागपुरातील रॅलीच्या पार्श्वभूमीवर भाजपने काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.

काँग्रेसला सवाल विचारणारं भाजपचं ट्विट काय?

काँग्रेसचं है तयार हम अभियान नेमकं कशासाठी?

१) हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनला साथ देण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?

२) स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?

३) काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेली साडे तीनशे कोटींची रोकड अवैध मार्गानं कशी मिळवावी हे सांगण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?

४) मोहब्बत की दुकानच्या नावानं द्वेष पसरविण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?

५) घराणेशाही कशी वाचवायची हे सांगण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?

काँग्रेस पक्षाचा आज स्थापना दिवस आहे. 139 व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात काँग्रेसकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. काँग्रेसच्या नागपूर येथे होणाऱ्या महारैलीसाठी साताऱ्यातील कराडमधून पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाल 600 हून जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते बसेसमधून नागपुरकडे रवाना झाले आहेत. या कार्यक्रमावर भाजपकडून टीका करण्यात आली आहे.

काँग्रेसकडून एक व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. काँग्रेसचं कार्य अन् काँग्रेसचा विचार यावर या व्हीडिओतून भाष्य करण्यात आलं आहे. “हम संघर्ष, त्याग, तपस्या और बलिदान हैं। इस देश से मोहब्बत करने वाले करोड़ों भारतीयों का स्वाभिमान हैं। हम हैं कांग्रेस”, असं ट्विट काँग्रेसकडून करण्यात आलं आहे. या ट्विटवर भाजपकडून टीका करण्यात आली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.