मुंबईतील खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लूट, पालिकेकडून 37 रुग्णालयांना दणका
मुंबईतील खासगी रुग्णालय कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी अव्वाच्या सव्वा बील आकारत असल्याच्या तक्रारी अनेकांनी (Mumbai BMC Action On Private Hospital) केल्या होत्या.
मुंबई : मुंबईतील खासगी रुग्णालय कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी अव्वाच्या सव्वा बील आकारत असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पालिकेने 37 खासगी रुग्णालयांना चांगलाच दणका दिला आहे. या कारवाईतून 1 कोटी 46 लाख 84 हजार रुपयांची परतफेड रुग्णांना करण्यात आली आहे. यामुळे रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे. (Mumbai BMC Action On Private Hospital overcharge Covid Patient)
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून लाखो रुपयांची आकारणी (बील) होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यानुसार मुंबई पालिका प्रशासनाने विविध खासगी रुग्णालयांसाठी लेखापरीक्षकांची नेमणूक केली होती. तेव्हापासून आतापर्यंत 37 रुग्णालयांतील 625 तक्रारींवर उपाय शोधले आहेत. तसेच या लेखा परीक्षकांनी इतर 490 तक्रारींमध्येही कार्यवाही केली आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
अशा एकूण 1 हजार 115 तक्रारीच्या प्रकरणात नियमानुसार, कार्यवाही केल्याने सुमारे 1 कोटी 46 लाख 84 हजार रुपयांची परतफेड करण्यात आली आहे. यातून रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य शासनाने खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा ताब्यात घेतल्या आहे.
या ८० टक्के खाटांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून कोणत्या दराने शुल्क आकारणी करावी याबाबतचा आदेशही जारी करण्यात आला आहे. या आदेशान्वये निर्धारित केलेल्या दरानुसार संबंधित रुग्णालयांनी शुल्क आकारणी करणे गरजेचे आहे. मात्र तरीही काही रुग्णालय रुग्णांकडून जादा रक्कम मागत असल्याच्या तक्रारी येत होत्या. यानुसार मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक खात्यातील प्रत्येकी 2 अधिकाऱ्यांची नियुक्ती ही खासगी रुग्णालयांसाठी केली होती.
या नियुक्तीमुळे बील आकारणी बाबत तक्रारींचा निपटारा होत आहे. तसेच पूर्वीच्या तुलनेत तक्रारींचा ओघ बऱ्याच अंशी कमी करण्यात यश आले आहे. (Mumbai BMC Action On Private Hospital overcharge Covid Patient)
#CoronavirusUpdates १९ जुलै, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/O1kVerIjnr
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 19, 2020
संबंधित बातम्या :
Ganeshotsava | गणेशोत्सवात ढोल-ताशाचा गजरही बंद, पथकांची आर्थिक घडी विस्कटण्याची चिंता
Mumbai Corona | आधी धारावी आता संपूर्ण मुंबईत कोरोना नियंत्रणात, पालिकेच्या 15 टिप्स!