मुंबई महापालिकेत तब्बल 38 हजार पद रिक्त, आरटीआय कार्यकर्त्याचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र 

मुंबई महापालिकेत तब्बल 38 हजार रिक्त पद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. (BMC 38 thousand post vacant)

मुंबई महापालिकेत तब्बल 38 हजार पद रिक्त, आरटीआय कार्यकर्त्याचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र 
मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका? इमारत सील होणार, कुणालाही प्रवेश नाही, वाचा पालिका आयुक्तांचे निर्देश
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 3:35 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेत तब्बल 38 हजार रिक्त पद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यातील सर्वाधिक पदं ही क आणि ड वर्गाची आहेत. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मुंबई महापालिकेत एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असताना प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. (Mumbai BMC More than 38 thousand vacant post RTI Report Reveals)

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महापालिकेतील मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांची माहिती आरटीआय कायद्यातंर्गत मागवली होती. मुंबई महापालिकेच्या सामान्य प्रशासनाने अनिल गलगली यांना सप्टेंबर 2020 पर्यंतच्या उपलब्ध अभिलेखाची माहिती दिली आहे. यानुसार सरळसेवा आणि पदोन्नती अंतर्गत 1,10, 509 पदे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी 38,128 पदे ही रिक्त आहेत.

नेमकी कोणकोणती पदं रिक्त?

तर सरळसेवा तांत्रिक आणि अतांत्रिक वर्गात एकूण 87,146 पदे मंजूर असून 28,608 पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक क गटात 10,553 पदं आहेत. तर ड वर्गात 15,789 पदे रिक्त आहेत. यात पदोन्नती तांत्रिक आणि अतांत्रिक वर्गात एकूण 23,363 पदे मंजूर असून 9520 पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक ड वर्गात 5020 पदे रिक्त आहेत. तर क आणि ड वर्गात दोन्ही संवर्गात 33,043 पदे रिक्त आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र 

या पार्श्वभूमीवर अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी ही रिक्त पद तात्काळ भरावी, अशी मागणी केली आहे. रिक्त पदामुळे कामकाजावर परिणाम होतो आणि नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागतो, असेही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच त्यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनाही पत्र लिहिले आहे. (Mumbai BMC More than 38 thousand vacant post RTI Report Reveals)

संबंधित बातम्या : 

मुंबईकरांनो तुमच्यासाठी सर्व यंत्रणा तयार, पण… : किशोरी पेडणेकर

Fire in Mumbai : दुकानाला आग लागलेली पाहून नाना पटोलेंनी गाडी थांबवली, अन्…

Bhandup mall fire : दिलगिरी व्यक्त करत मुख्यमंत्री म्हणाले, दोषींना सोडणार नाही, आता पोलिसांकडून तातडीने चौकशी सुरू

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.