मुंबईत बर्निंग कारचा थरार, गाडीत दोन महिला असताना अचानक पेट

मुंबईतील बोरीवली पश्चिमेला एमएचबी पोलीस स्टेशनसमोर मेट्रो स्टेशनखाली हा प्रकार घडला. (Mumbai Borivali Burning Car Video)

मुंबईत बर्निंग कारचा थरार, गाडीत दोन महिला असताना अचानक पेट
बोरीवलीत कारने अचानक पेट घेतला
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 3:55 PM

मुंबई : मुंबईतील बोरीवली भागात भरदिवसा बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. बोरीवली पश्चिमेला धावती कार आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. यावेळी गाडीत एक महिला आणि मुलगी होती. सुदैवाने दोघींना सुखरुप बाहेर काढण्यात वेळीच यश आलं. (Mumbai Borivali Burning Car Video)

मुंबईतील बोरीवली पश्चिमेला एमएचबी पोलीस स्टेशनसमोर मेट्रो स्टेशनखाली हा प्रकार घडला. लिंक रोडवर असताना धावत्या कारमध्ये अचानक आग लागली. गाडीतून धुराचे लोट बाहेर येत होते. कारमध्ये बसलेली महिला आणि मुलगी बालंबाल बचावली.

ही घटना आज (मंगळवार) दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

भरधाव टेम्पोची टॅक्सीला धडक, मुंबईत परेल ब्रिजजवळ भीषण अपघात

मुंबईतील परळ ब्रिजवर उभ्या असलेल्या टॅक्सीला मंगळवारी पहाटे भरधाव टेम्पोने टक्कर दिली होती. या अपघातात टॅक्सीच्या मागील बाजूचे नुकसान झाले. फ्लायओव्हरवर उभं असताना टेम्पोने मागून धडक दिल्याचं टॅक्सीचालकाने सांगितलं. टॅक्सीचा नंबर MH 01 AT 3548 तर टेम्पोचा नंबर MH 04 JU 4377 आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या मुंबई वाहतूक पोलिसांच्या टीमने प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

सांगलीत एकामागून एक गाड्या धडकल्या

एकामागून एक अशा पाच गाड्यांचा भीषण अपघात झाला आहे. सांगलीच्या नेर्ले येथील आशियाई महामार्गावर हा अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात गाड्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सांगलीच्या नेर्ले गावाकडून महामार्गावरुन अज्ञात चारचाकी वाहनाने सरळ महामार्गावर प्रवेश केला. त्यामुळे कोल्हापूरमार्गे येणार एका कार चालकाने गाडीचा वेग कमी केला. त्यामुळे पाठीमागून अतिवेगात येणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्या. यामुळे हा अपघात झाला. यावेळी महामार्गावर मोठी गर्दी झाली होती. (Mumbai Borivali Burning Car Video)

नवी मुंबईत हिट अँड रन

नवी मुंबईतील पामबीच रस्त्यावर अपघात करून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी हिट अँड रन प्रकरणी ताब्यात घेतले. शनिवार रात्री दीड वाजता पामबीच मार्गावर दुचाकीला धडक देऊन आरोपी पळून गेला होता. रोहन अ‍ॅबॉर्ट (वय 32) याला पोलिसांनी अटक करुन कोर्टात हजर केले असता बेलापूर कोर्टातून आरोपीला जामीन मिळाला आहे. कारच्या धडकेत अक्षय गमरे आणि संकेत गमरे या दोन भावांचा जागीच मृत्यू झाला होता. मयत तरुण मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याची मुलं आहेत.

संबंधित बातम्या :

सांगली महामार्गावर भीषण अपघात, गाड्या एकमेकांना धडकल्या

नवी मुंबईत मर्सिडीजच्या धडकेत दोघा पोलिसपुत्रांचा मृत्यू, प्रसिद्ध हॉटेलियरचा मुलगा अटकेत

(Mumbai Borivali Burning Car Video)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.