AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्य रेल्वेचा महत्त्वपूर्ण निर्णय, मुंबईतील रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट बंद

मध्य रेल्वेने याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (Mumbai Central railway Platform tickets Sell Off)

मध्य रेल्वेचा महत्त्वपूर्ण निर्णय, मुंबईतील रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट बंद
Railway Platform
| Updated on: Apr 09, 2021 | 12:50 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रासह मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. यामुळे मुंबईत अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार मुंबईतील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटांची विक्री तात्काळ बंद करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (Mumbai Central railway Platform tickets Sell Off)

मध्य रेल्वेचे पीआरओ शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. तर दुसरीकडे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट तातडीने बंद करण्यात आल्या आहेत. यात मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिन्स, कल्याण, ठाणे, दादर, सीएसएमटी या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या ठिकाणच्या सर्व प्लॅटफॉर्म तिकीट बंद ठेवल्या जाणाऱ्या आहेत.

दरम्यान दुसरीकडे वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारनं कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच मुंबईसह उपनगरीय लोकल रेल्वेवर पुन्हा निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे.

कोरोना वाढतोय, लोकलवर लवकरच निर्णय

“राज्यात तसेच मुंबईत कोरोना संसर्ग वाढत आहे. सामान्यांचा रोजगार बुडत होता म्हणून मागच्या वर्षी लोकल बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सध्या लोकांची गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. लोकल पूर्ण बंद करावी किंवा मागच्या वेळेस लोकल सेवेला जे निर्बंध होते ते घालावेत; यावर राज्य सरकारचा विचार सुरु आहे. त्यावर लवकरच विचार केला जाईल,” असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

मुंबईतील कोरोना स्थिती काय? 

मुंबईत गुरुवारी 8937 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 23 रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात 48 हजार 902 चाचण्या करण्यात आल्या. त्या तुलनेत बाधितांचे प्रमाण 18.27 टक्के आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या 86 हजारांच्यापुढे गेली आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधी एक महिन्यावर आला आहे. (Mumbai Central railway Platform tickets Sell Off)

संबंधित बातम्या : 

बीकेसीसह मुंबईतील 26 लसीकरण केंद्र बंद; वाचा, सविस्तर लिस्ट

Corona Vaccine : लसीकरण केंद्र जाणिवपूर्वक बंद करुन चुकीच्या बातम्या पसरवण्याचं कारण काय? फडणवीसांचा सवाल

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.