Video: मुंबईत शिवसैनिकांचा तुफान राडा, ‘अदानी एअरपोर्ट’वर संतप्त, जोरदार तोडफोड

मुंबई विमानतळाचे संचालन अदानी ग्रुपच्या हाती गेल्यानंतर 'अदानी एअरपोर्ट' अशा पाट्या विमानतळ परिसरात लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे व्हीआयपी गेट नंबर 8 आणि विलेपार्ले हायवेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरील बोर्ड शिवसैनिकांनी लाठ्यांनी तोडला.

Video: मुंबईत शिवसैनिकांचा तुफान राडा, 'अदानी एअरपोर्ट'वर संतप्त, जोरदार तोडफोड
अदानीच्या बोर्डची शिवसैनिकांकडून तोडफोड
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 3:14 PM

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) परिसरात असलेल्या अदानीच्या बोर्डची शिवसैनिकांनी तोडफोड केली. विमानतळाचे संचालन अदानी ग्रुपच्या (Adani Group) हाती गेल्यानंतर ‘अदानी एअरपोर्ट’ अशा पाट्या विमानतळ परिसरात लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी या बोर्डची तोडफोड केली. अदानी कंपनीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा विसर पडला का? असा प्रश्न विचारला.

नेमकं काय घडलं?

व्हीआयपी गेट नंबर 8 आणि विलेपार्ले हायवेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरील बोर्ड शिवसैनिकांनी लाठ्यांनी तोडला. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. मात्र तिथे अदानी विमानतळ असे लावलेले बोर्ड अजिबात सहन केले जाणार नाहीत, असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. जीवीके प्रमाणे ‘मॅनेज्ड बाय अडानी एयरपोर्ट’ असा बोर्ड ठेवण्याची सूचना शिवसेनेने केली आहे. अन्यथा जिथे फलक दिसेल, तिथे तोडफोड करण्याचा सेना नेत्यांनी इशारा दिला आहे.

पाहा व्हिडीओ :

अदानी समुहाकडे मुंबई विमानतळाचे संचालन

अदानी समुहाने हवाई प्रवास क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. देशातील अनेक मोठमोठ्या विमानतळांचे संचालन अदानी समूहाकडे आहे. जुलै महिन्यातच मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संचलनाची संपूर्ण जबाबदारी अदानी समुहाकडे सोपवण्यात आली होती. समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी ट्वीट करुन याविषयी माहिती दिली होती.

गौतम अदानी यांचे ट्वीट

जागतिक दर्जाच्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही मुंबईला अभिमान वाटेल, अशी कामगिरी करण्याचे वचन देतो. व्यवसाय, आराम आणि मनोरंजनासाठी अदानी समूह भविष्यातील विमानतळ परिसंस्था तयार करेल. आम्ही हजारो नवीन स्थानिक रोजगार निर्माण करू, असे आश्वासन गौतम अदानी यांनी दिले होते.

संबंधित बातम्या :

मुंबई विमानतळ ताब्यात घेतलेल्या गौतम अदानींना व्यवसायात मोठा आर्थिक फटका

मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादेत नेणार का?, अदानी समूहाकडून मोठा खुलासा

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.