AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांवर ठाकरे गटाचा दबाव होता; निकाल बाजूने लागण्यानंतर एकनाथ शिंदे असं का म्हणाले?

CM Eknath Shinde on Maharashtra Assembly Speaker Rahul Narwekar Judgement About Shivsena : विधानसभा अध्यक्षांवर ठाकरे गटाचा दबाव होता, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान, वाचा...

विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांवर ठाकरे गटाचा दबाव होता; निकाल बाजूने लागण्यानंतर एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
| Updated on: Jan 11, 2024 | 11:39 AM
Share

मुंबई | 11 जानेवारी 2024 : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा काल निकाल लागला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलताना त्यांनी या निकालाचं स्वागत केलं. तसंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाबाबत मोठं विधान केलं. त्यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. विधानसभा अध्यक्षावर ठाकरे गटाचा दबाव असल्याचं एकनाथ शिंदे म्हणालेत. ते लोक शिवसेना पक्षाला प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून वापरत होते. परंतु असं करू शकत नाही. म्हणून हा मोठा झटका त्यांना मिळालेला आहे. हुकूमशाही पद्धतीने पार्टी चालवणाऱ्या लोकांना हा मोठा झटका देण्यात आलेला आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले…

भरत गोगावले यांची याचिका पूर्णपणे कॅन्सल केलेली आहे. यामध्ये कोणता दबाव अध्यक्षांवरती होता का? हे देखील समोर यायला हवं. आम्ही लवकरच सोबत बसून बोलू आणि नंतर निर्णय घेऊ, असं एकनाथ शिंदे म्हणाले. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशीरा माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी हे विधान केलं.

“हा प्रभूरामांचा आशिर्वाद”

विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा प्रभू श्रीरामांनी दिलेला आशीर्वाद आहे. 22 तारखेला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. त्या आधी या ठिकाणी निर्णय मिळाला. सर्व जनतेला न्याय मिळाला. आजचा निर्णय हा आपल्या सगळ्यांचा आहे. हे लोक आधीपासून वेगवेगळी विधानं करत होते. मुख्यमंत्री आज जाणार, परवा जाणार असं सारखं बोलत होते. परंतु मी अजूनपर्यंत कायम आहे, असंही शिंदे म्हणाले.

“हा लोकशाहीचा विजय”

आजचा निर्णय हा लोकशाहीचा विजय आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेचा विजय आहे. आजचा जो निर्णय झालेला आहे तो प्रत्येक ठिकाणी एक माइल स्टोन ठरणार आहे. पक्ष लोकशाही पद्धतीने चालवला पाहिजे, अशा प्रकारचा संदेश आजच्या या निकालातून मिळालेला आहे. या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि हा निर्णय जनतेच्या दृष्टीने खूप योग्य आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं.

आगामी लोकसभा निवडणूक आणि महायुतीचं जागावाटप यावरही शिंदेंनी भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीमध्ये 45 पेक्षा जास्त जागा महायुतीच्या जिंकून येणार आहे, असंही शिंदे म्हणाले.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.