अक्षय कुडकेलवार, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. काँग्रेसचं शनिवारी (12 जून) पेट्रोल दरवाढीविरोधात गोरेगावमध्ये आंदोलन सुरु होतं. यावेळी कार्यकर्त्यांना सूचान देण्यासाठी आलेल्या पोलिसांसोबत भाई जगताप यांची बाचाबाची झाली. यावेळी भाई जगताप यांनी एका पोलीस कॉन्स्टेबलला जोराचा धक्का देखील दिला. हा संबंध प्रकार कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे (Mumbai Congress Leader Bhai Jagtap clash with Mumbai Police during congress protest in Goregaon).
भाई जगताप यांचा पोलिसांसोबत बाचाबाची झाल्याचा व्हिडीओ आता समोर आाल आहे. या व्हिडीओत काँग्रेसचं आंदोलन सुरु असल्याचं दिसत आहे. या आंदोलनात काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप हे देखील सहभागी झाले आहेत. जगताप यांच्या हातात माईक असतो. या आंदोलनावेळी काही पोलीस घटनास्थळी येतात. ते आंदोलकांना सूचना देतात. यावेळी भाई जगताप पोलिसांकडे येतात. ते पोलिसांना आरे-तुरेची भाषा वारताना दिसतात. हा (पोलीस) जर आंदोलन बंद करा, असं सांगत असेल तर हे आंदोलन संध्याकाळपर्यंत सुरु ठेवा, असं जगताप यावेळी म्हणतात. त्यानंतर इतर आंदोलक जोरजोरात घोषणाबाजी करतात.
पोलीस यावेळी भाई जगताप यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. यावेळी भाई जगताप थेट पोलिसांवर चालून जातात. ते एका पोलीस कॉन्स्टेबलला जोराचा धक्का देतात. विशेष म्हणजे यावेळी भाई जगताप यांच्यासोबत आंदोलनात सहभागी असलेले आंदोलकही पोलिसांवर चालून जाण्याचा प्रयत्न करतात. यावेळी प्रकरण चिघळेल याची जाणीव जगताप यांना होते. त्यानंतर ते आपल्या कार्यकर्त्यांना मागे सरकरण्याचं आवाहन करतात. यावेळी त्यांचे कार्यकर्ते आणखी जोमाने पोलिसांवर चालून जाण्याचा प्रयत्न करतात. अखेर भाई जगताप यांच्या आवाहनानंतर ते मागे सरकतात (Mumbai Congress Leader Bhai Jagtap clash with Mumbai Police during congress protest in Goregao).
व्हिडीओ बघा :
VIDEO : मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांची पोलिसांसोबत बाचाबाची आणि धक्काबुक्की #Congress #MumbaiCongress pic.twitter.com/aetVlYVlvt
— CHETAN PATIL (@chetanpatil1313) June 13, 2021
हेही वाचा : गुलामसारखी वागणूक तुम्हाला मिळत होती तेव्हा शिवसेनेचा स्वाभिमान कुठं होता? राम कदम यांचा सवाल