Mumbai Corona | मुंबईत कोरोना रोखण्यासाठी पालिकेचा मास्टर प्लॅन, मॉल्स, रेल्वे स्थानकांवर चाचण्या
खाजगी हॉस्पिटलमधील लसीकरण वाढवण्यासाठीही पालिका कडक पावलं उचलणार आहे. (Mumbai Corona Antigen tests after patient increase)
मुंबई : राज्यात कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून चाचण्या वाढवण्याकडे विशेष लक्ष दिलं जातं आहे. मुंबईतील मॉल्स, रेल्वे स्थानक, बस स्थानकांवर अँटिजेन चाचण्या होणार आहेत. मुंबईतील 25 प्रमुख मॉलमध्ये प्रत्येक ग्राहकाची अँटिजेन चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी निगेटिव्ह आल्यानतंरच त्यांना मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. (Mumbai Corona Antigen tests after patient increase)
मुंबईतील मॉलमध्ये अँटिजेन चाचण्या
मुंबईतील प्रसिद्ध पॅलेडियम, फिनिक्स, रुण्वाल, इन्फिनिटी, इनॉर्बिट यांसारख्या मोठ्या मॉलमध्ये दररोज हजारोंच्या संख्येनं लोक येत असतात. विक एन्डला तर मुंबईतील सर्व मॉलमध्ये लाखो लोकांची गर्दी होते. त्यामुळे मुंबईतील मोठ्या मॉलमध्ये प्रवेशासाठी अँटिजेन चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी बंधनकारक केल्यास आपोआप गर्दीला आळा बसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईत येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या
तसेच मुंबईतील खाऊ गल्लीचा स्टाफ आणि मुंबईतील रेस्टॉरंटच्या स्टाफची कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील बाहेरगावच्या रेल्वे येणारे 7 मुख्य रेल्वे स्थानकातही प्रवाशांच्या चाचण्या केल्या जाणार आहे. यात वांद्रे, दादर, बॉम्बे सेंट्रल, सीएसएमटी, कुर्ला, अंधेरी, बोरिवली या स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांवर दर दिवसाला प्रत्येकी किमान 1 हजार प्रवाशांच्या चाचण्या होणार आहे.
विशेषत: विदर्भातून येणाऱ्या प्रवाशांवर प्रशासनाचं विशेष लक्ष असणार आहे. मुंबईतील मुख्य बस स्थानक दादर, परळ येथे दररोज 1 हजार प्रवाशांच्या चाचण्या होणार आहे. मुंबईत दिवसाला 50 हजार टेस्ट करण्याचं प्रशासनाचं लक्ष आहे. सध्या मुंबईत दिवसाला 20 ते 23 हजार चाचण्या केल्या जात आहे. (Mumbai Corona Antigen tests after patient increase)
लसीकरण वाढवण्याच्या सूचना
तर खाजगी हॉस्पिटलमधील लसीकरण वाढवण्यासाठीही पालिका कडक पावलं उचलणार आहे. मुंबईतील 43 खाजगी रुग्णालयात लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. मात्र खासगी हॉस्पिटलमध्ये दरदिवसाला किमान 1 हजार लसीकरण करण्याची सक्ती करण्यात आली आहे. सध्या सरासरी 45 हजार लोकांचे मुंबईत दररोज लसीकरण होते आहे. यापैकी केवळ 5 हजार लोकांचे लसीकरण खाजगी हॉस्पिटलमध्ये करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे जर रुग्णालयांना लसीकरणाची अपेक्षित संख्या गाठता आली नाही. तसेच नियमाप्रमाणे योग्य सुविधा नसतील तर खाजगी हॉस्पिटलचे लसीकरण करण्याचे अधिकार प्रशासन काढून टाकणार आहे. त्यामुळे, खासगी लसीकरण केंद्रांना प्रशासनानं लसीकरण बुथ वाढवण्याच्या, योग्य सुविधा देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
धारावीत लसीकरणाचा वेग वाढवणार
दरम्यान मुंबईतील कोरोनाचा हॉट्स्पॉट ठरलेल्या धारावीतही लसीकरणाचा वेग वाढण्यात येणार आहे. धारावीतील करोना आटोक्यात आणण्यासाठी पालिकेने प्रयत्न केले होते. यानंतर जगभरात ‘धारावी मॉडेल’ म्हणून याची ओळख झाली. याच धारावीत आता लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी नवे प्रारूप तयार करण्यात येत आहे.
धारावीसाठी सोमवारपासून स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू होणार आहे. यानुसार धारावीत एकाच दिवशी हजार नागरिकांना लस देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी धारावीकरांना अॅपवर नोंदणीसाठी आणि डॉक्टरांच्या प्रमाणपत्रासाठी मदत करण्याकरिता खासगी डॉक्टरांची आणि स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे.
दिवसभरात 25 हजार 833 नवे रुग्ण
राज्यात काल दिवसभरात तब्बल 25 हजार 833 नवे रुग्ण आढळून आले आहेत. नवीन वर्षातील हा सर्वात मोठा आकडा आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनास्थिती आता चिंताजनक होताना दिसत आहे. दिवसभरात 12 हजार 764 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर 58 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 1 लाख 66 हजार 353 रुग्णावर उपचार सुरु आहेत. (Mumbai Corona Antigen tests after patient increase)
मुंबई पोलीस दलातील विशेष पथकाची पुनर्रचना, पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंचा पहिला निर्णय https://t.co/New9C3fub2 #MumbaiPolice | #HemantNagrale
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 19, 2021
संबंधित बातम्या :
मुंबईत कोरोनाचा उच्चांक; आतापर्यंतची सर्वाधिक 2877 रुग्णांची नोंद