Mumbai Corona : मुंबईत 7 दिवसात दुप्पट रुग्णवाढ! रुग्णवाढीचा वेग कायम राहिल्यास पुन्हा मास्कसक्ती?
Mumbai corona update : मागील दोन वर्षात कोरोनाच्या काळात नियमावली पाळल्यानंतर कोरोना आटोक्यात आणता येतो. हे राज्य सरकार आणि आरोग्य विभागाने दाखवून दिलं आहे. एप्रिल महिन्यात कोरोनाची तिसरी लाट पुर्णपणे आटोक्यात आली.
मुंबई – दोन वर्षापूर्वी कोरोनाने (Corona) शिरकाव केल्यानंतर खूप जलद गतीने त्याचा संसर्ग झाला. मागच्या काही दिवसांपासून रूग्णांची संख्या दुपटीने वाढत आहे. म्हणजे रूग्णांमध्ये 1527 ने वाढ झाली आहे. तर दुपटीचा कालावधी म्हणजे 3396 दिवसांवरून 1631 दिवसांपर्यंत आला आहे. पुढील आठ दिवसात अशा पद्धतीची कोरोना संसर्ग राहिला आणि रूग्णांच्या संख्यते (corona patients) वाढ झाली. समजा परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यास मास्कबंधी निर्बंध लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी दिली. रूग्णांचा आकडा वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) कोरोना टास्क फोर्सचे टीमसोबत देखील बैठक घेतली होती. त्यावेळी राज्यातील नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळायला हवेत असंही मुख्यमंत्र्यांनी जनतेला आवाहन केलं होतं.
महाराष्ट्रातही रूग्णांची कोरोना रूग्णांची संख्या वाढली
महाराष्ट्रात शुक्रवारी 1,134 नवीन कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णांची नोंद झाली. 24 फेब्रुवारीपासून कोरोनाचा संसर्ग दररोज सर्वाधिक वाढत असून त्यामध्ये आत्तापर्यंत तीघांचा मृत्यू झाला आहे असं आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. कोरोना संसर्ग असलेल्या रूग्णांची संख्या 12 टक्क्यांनी वाढली आहे, त्यामुळे 5 हजारांचा चा टप्पा ओलांडला आहे. राज्यातील एकूण कोरोना केसेस 78,90,346 वर पोहोचल्या आहेत. तर मृतांची संख्या 1,47,864 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे 24 फेब्रुवारी रोजी नोंदवलेल्या 1,182 प्रकरणांनंतर दैनंदिन वाढ सर्वाधिक होतं होती. 1,045 रूग्णांना गुरूवारी कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले, त्यापैकी एकाचाही मृत्यू झाला नाही ही आरोग्य विभागाची मोठी झेप असल्याचं एका अधिकाऱ्यांने स्पष्ट केलं आहे. पुढील आठवडाभर रूग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर राज्यात मास्कसक्ती आणि निर्बंध लागू होऊ शकतात अशी माहिती राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी दिली.
नागरिकांनी मास्कचे पालन करावे
मागील दोन वर्षात कोरोनाच्या काळात नियमावली पाळल्यानंतर कोरोना आटोक्यात आणता येतो. हे राज्य सरकार आणि आरोग्य विभागाने दाखवून दिलं आहे. एप्रिल महिन्यात कोरोनाची तिसरी लाट पुर्णपणे आटोक्यात आली. जून पहिल्या आठवड्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारची आणि आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी कोरोना टास्क फोर्ससोबत एक मीटिंग केली. त्यामध्ये नागरिकांनी कोरोनाची नियमावली पाळावी असं आवाहन करण्यात आलंय. नागरिकांनी नियम नाही पाळले. तर पुन्हा राज्यात मास्क आणि निर्बंध पुन्हा लागू होईल.
नागरिकांनी मास्कचे पालन करावे तसेच हात स्वच्छ धुवावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.