मुंबईकरांना दिलासा, दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट, रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला
मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 92 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 189 दिवसांवर आला आहे. (Mumbai Corona growth Decrease)
मुंबई : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेली मुंबई कोरोनाच्या विळख्यातून मुक्त होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तसेच बरे झालेल्या रुग्णांचा दरही वाढला आहे. त्याशिवाय मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतही वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. (Mumbai Corona Daily Patient growth Decrease)
मुंबईकरांना दिलासा
मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट होत आहे. तर मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 92 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 189 दिवसांवर आला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 2 हजार 037 रुग्ण बरे
मुंबई शहरासह उपनगरात काल दिवसभरात 2 हजार 037 रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण 6 लाख 29 हजार 410 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईत 38 हजार 649 रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबईत काल दिवसभरात 1 हजार 946 रुग्णांची तर 68 मृत्यूंची नोंद झाली आहे.
मृतांचा आकडा 14 हजारांच्या पार
दरम्यान मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 लाख 84 हजार 48 झाली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 14 हजार o76 वर पोहोचली आहे. मुंबईत गेल्या 6 ते 12 मेपर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर 0.35 टक्का असल्याची नोंद आहे. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी दिवसभरात 30,886 चाचण्या केल्या गेल्या. तर आतापर्यंत 58 लाख 26 हजार 74 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा
#CoronavirusUpdates १३ मे, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण – १९४६
२४ तासात बरे झालेले रुग्ण – २०३७ बरे झालेले एकूण रुग्ण – ६२९४१० बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९२%
एकूण सक्रिय रुग्ण- ३८६४९
दुप्पटीचा दर- १८९ दिवस कोविड वाढीचा दर (६ मे -१२ मे)- ०.३६%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 13, 2021
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा
राज्यात काल दिवसभरात 42,582 नवीन रुग्णांचे निदान झाल्यानं काहीसा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे. राज्यात काल रोजी एकूण 5,33,294 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 52,69,292 झाली आहे.
काल 54,535 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात आजमितीस एकूण 46,54,731 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 88.34 % एवढे झाले आहे. आजमितीस तपासण्यात आलेल्या 3,03,51,356 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 52,69,292 (17.36 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत. सध्या राज्यात 35,02,630 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 28,847 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. (Mumbai Corona Daily Patient growth Decrease)
संबंधित बातम्या :
महाराष्ट्राला दिलासा! राज्यात आज 42,582 नव्या रुग्णांचे निदान