Mumbai Corona | मुंबईकरांनो सावधान! कोरोना दुपटीचा कालावधी 186 वरुन 97 दिवसांवर

त्यामुळे मुंबईकरांवरील कोरोनाचा धोका आणखी वाढल्याची शक्यता आहे. (Mumbai Corona doubling rate update)

Mumbai Corona | मुंबईकरांनो सावधान! कोरोना दुपटीचा कालावधी 186 वरुन 97 दिवसांवर
मुंबई कोरोना
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 1:15 PM

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुंबईतील शहरातील कोरोना रुग्णदुप्पटीचा कालावधी आठवडाभरातच 186 दिवसांवरुन 97 दिवसांवर आला आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील कोरोनाचा धोका आणखी वाढल्याची शक्यता आहे. (Mumbai Corona doubling rate update)

मुंबईतील बेडच्या संख्येत वाढ

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका बेडच्या संख्येत वाढ करणार आहे. वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन शहरातील खासगी आणि पालिका रुग्णालयातील बेडची संख्या वाढवण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसात मुंबईत 3500 हून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईत खासगी आणि पालिका रुग्णालयातील बेडची संख्या 12500 हून पुन्हा 18 हजारांवर नेण्यात येणार आहे, अशा सूचना पालिकेने दिल्या आहेत. तर उपनगरीय रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी 791 बेड दोन दिवसात सुरु करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. तसेच येत्या दोन दिवसात रुग्णालयात 791 बेड्स सुरु करा, असे आदेश पालिकेने दिले आहेत.

रुग्ण दुपटीच्या कालवधीत घट

मुंबईतील शहरातील कोरोना रुग्णदुप्पटीचा कालावधी आठवडाभरातच 186 दिवसांवरुन 97 दिवसांवर आला आहे. दरदिवशी नव्याने निदान होणाऱ्या रुग्णसंख्येने आतापर्यंत सर्व विक्रम मोडले आहेत. गेल्या आठवड्यात मुंबईने साडेतीन हजारांचा टप्पा पार केला आहे.

मुंबई शहरातील नऊ उपनगरीय रुग्णालयात पुन्हा कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. यासाठी या रुग्णालयांना दोन दिवसांत खाटा उपलब्ध करा, अशी सूचना पालिकेने दिली आहे. त्याशिवाय येत्या सोमवारपासून या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.

मुंबईतील नव्या कोरोना रुग्णालयांची यादी

  • के.बी.भाभा रुग्णालय (वांद्रे)
  • स.का.पाटील रुग्णालय (मालाड
  • डॉ. आंबेडकर रुग्णालय (कांदिवली शताब्दी)
  • भगवती रुग्णालय, के.बी. भाभा (कुर्ला)
  • माँ रुग्णालय (चेंबूर)
  • मदन मालवीय रुग्णालय (गोवंडी)
  • राजावाडी रुग्णालय (घाटकोपर)
  • एम.टी.अगरवाल (मुलुंड)

(Mumbai Corona doubling rate update)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात 24 हजार 645 रुग्ण, मुंबई, पुणे, नागपुरातील काय स्थिती?

मुंबईत कोरोना रोखण्यासाठी ‘मिशन टेस्टिंग’ सुरु, ‘या’ ठिकाणी होणार चाचण्या

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता, खासगी रुग्णालयांकडून बेड राखीव ठेवण्यास नकार

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.