Mumbai Corona Update | अत्यंत चिंताजनक! मुंबईच्या रुग्णसंख्येनं 20 हजारचा टप्पा ओलांडला
महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला 20 हजाराच्या पुढे गेली तर लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबईची वाटचाल आता लॉकडाऊन अटळ असल्याचंच अधोरेखित होताना पाहायला मिळतंय.
मुंबई : मुंबई आज तब्बल 20 हजारपेक्षा (20 thousand plus covid cases in a single day in Mumbai) नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. 20181 नव्या रुग्णांचं निदान आज मुंबईत झालं आहे. तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
चिंताजनक आकडेवारी
मुंबई आज दिवसभरात वीस हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले असून कोणहीती लक्षणं नसलेल्या रुग्णांची संख्याही प्रचंड मोठी असल्याचं समोर आलं आहे. तब्बल 17154 रुग्ण असे आढळून आले आहेत, ज्यांना कोणतीही लक्षणं नाही. अशा लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ही जास्त असल्याचंही समोर आलं आहे. दरम्यान, आज रुग्णालयात एकूण 1 हजार 170 रुग्णांचा दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दिवसभरात एकूण 2 हजार 837 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर हा 88 टक्के इतका नोंदवला गेला आहे. तर तब्बल 67487 इतक्या चाचण्या मुंबईत करण्यात आल्या आहेत.
कालची आकडेवारी काय होती?
राज्यात कोरोनाचा फैलाव (Corona Outbreak) आता अधिक चिंताजनक बनलाय. एकीकडे मुंबईत कालच्या तुलनेत जवळपास पाच हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे.. राजधानी मुंबईत (Mumbai) तर बुधवारीही कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळाला होता. मुंबईत बुधवारी (4 जानेवारी) तब्बल 15 हजार 166 नवे रुग्ण (Corona Patient) आढळून आले होते. तर 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होत. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.
आता लॉकडाऊन अटळ?
महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला 20 हजाराच्या पुढे गेली तर लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबईची वाटचाल आता लॉकडाऊन अटळ असल्याचंच अधोरेखित होताना पाहायला मिळतंय. आज झालेल्या रुग्णवाढीनंतर आता महापौर किशोर पेडणेकर यांच्या आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री मुंबईबाबत काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.
#CoronavirusUpdates 6th January, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) – 20181 Discharged Pts. (24 hrs) – 2837
Total Recovered Pts. – 7,55, 563
Overall Recovery Rate – 88%
Total Active Pts. – 79260
Doubling Rate – 70 Days Growth Rate (30 Dec – 5Jan)- 0.99%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 6, 2022
आजच्या बैठकीनंतर काय म्हणाले आरोग्यमंत्री? पाहा व्हिडीओ –
इतर बातम्या –
कोरोनाचा कहर वाढला, वैद्यकीय विभागाच्या आजच्या बैठकीत काय निर्णय? वाचा सविस्तर
शाळा, कॉलेज बंद करून मुले मॉल्समध्ये फिरणार असतील तर काय? लॉकडाऊनबाबत काय म्हणाले आरोग्यमंत्री टोपे?