AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona | मुंबईत कोरोनाचा हाहा:कार, दिवसभरात तब्बल 11,163 नवे रुग्ण, तर 25 रुग्णांचा मृत्यू, संपूर्ण शहराची परिस्थिती काय?

मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्यावे वाढत असून परिस्थिती एकदम गंभीर होत चालली आहे (Mumbai Corona Cases Update)

Corona | मुंबईत कोरोनाचा हाहा:कार, दिवसभरात तब्बल 11,163 नवे रुग्ण, तर 25 रुग्णांचा मृत्यू, संपूर्ण शहराची परिस्थिती काय?
corona virus news
| Updated on: Apr 04, 2021 | 9:20 PM
Share

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्यावे वाढत असून परिस्थिती एकदम गंभीर होत चालली आहे (Mumbai Corona Cases Update). मुंबईत आज दिवसभरात तब्बल 11 हजार 163 नवे रुग्ण आढळले. तर 25 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला. रुग्णसंख्या वाढत असल्यानं पालिकेच्या आरोग्य यंत्रणेची झोप उडालीय. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबईची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढतेय. मुंबईतील दैनंदिन रुग्ण वाढीचा सरासरी दर आता 1.54 टक्क्यांवर पोहोचलाय. कदाचित हा पुढे आणखी वाढण्याचा धोका देखील आहे. मुंबई शहरात चार नवे हॉटस्पॉट तयार झालेत. मुंबईच्या कोरोना परिस्थितीवर सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

मुंबईतील चार नवे कोरोना हॉटस्पॉट कोणते?

मुंबईत कोरोनाचे 4 नवीन हॉटस्पॉट आढळले आहेत. गोरेगाव, वांद्रे पश्चिम, अंधेरी पूर्व – पश्चिम आणि चेंबूर असे नवीन विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू लागले आहेत. यापैकी सर्वाधिक सक्रिय रुग्ण हे अंधेरीत आहेत. सुरुवातीला चेंबूर, गोवंडी, वांद्रे या काही विभागांमध्ये रुग्णवाढ दिसून येत होती. आता पश्चिम उपनगरात अंधेरी ते बोरिवलीपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येतेय (Mumbai Corona Cases Update).

दररोज 42 ते 45 हजार कोरोना चाचण्या 

मुंबईत दररोज सुमारे 42 ते 45 हजार कोरोना चाचण्या केल्या जातायंत. तर आज सर्वाधिक 51,319 चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत दररोज सरासरी आठ ते नऊ हजार बाधित रुग्णांची नोंद होतेय. दुसरीकडे मुंबईतील रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी कमी होऊन 42 दिवसांवर आलाय.

रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी किती?

रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीचा विचार केलात तर गोरेगाव विभागात हे प्रमाण 33 दिवस, वांद्रे पश्चिम येथे 34 दिवस, अंधेरी पूर्व – जोगेश्वरी येथे 37 दिवसांमध्ये, चेंबूर – गोवंडी विभागात 37 दिवस आणि अंधेरी प. येथे 38 दिवसांमध्ये रुग्ण संख्या दुप्पट होत असल्याचे आढळून आले आहे.

मुंबईत कोरोनाचे चार नवे हॉटस्पॉट

मुंबईतील रुग्णालयांत रोज हजारोंनी नव्या रुग्णांची भर पडू लागलीये तर आता 4 नव्या हॉटस्पॉटचीही वाढ झालीय. कोणत्या विभागात किती टक्के रुग्णवाढ झालीय याबाबतही जाणून घेऊयात :

विभाग : दैनंदिन रुग्ण वाढ

पी दक्षिण (गोरेगाव) – 2.14 टक्के एच पश्चिम (वांद्रे पश्चिम) – 2.09 टक्के के पूर्व (अंधेरी, जोगेश्वरी) – 1.90 टक्के एम पश्चिम (चेंबूर) – 1.90 टक्के के पश्चिम (अंधेरी) – 1.82 टक्के एफ उत्तर (माटुंगा – सायन) – 1.79 टक्के पी उत्तर (मालाड) – 1.64 टक्के आर दक्षिण (कांदिवली) – 1.64 टक्के

मुंबईत सर्वाधिक सक्रिय रुग्ण कुठे?

के पश्चिम (अंधेरी प.) – 4849 के पूर्व (अंधेरी पूर्व, जोगेश्वरी) – 4171 आर मध्य – 3549 आर दक्षिण – 3484 पी उत्तर – 3423

मुंबईत आतापर्यंत 681 इमारती सील

पाचहून अधिक बाधित रुग्ण आढळल्यावर संपूर्ण इमारत सील करण्यात येतेय. सील करण्यात आलेल्या सर्वाधिक 167 इमारती अंधेरी पश्चिम या विभागातील आहेत. त्यापाठोपाठ परळ विभागात 83, ग्रँट रोड- मलबार हिल येथे 79, चेंबूर – गोवंडी परिसरात 59 आणि भायखळा परिसरात 57 इमारती सील आहेत. आतापर्यंत एकूण सीलबंद इमारतींची संख्या 681 वर पोहचलीय.

सध्या फक्त चार हजार बेड

दुसरीकडे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं युद्धपातळीवर तयारी सुरु केलीय. गेल्या सात दिवसात 3000 कोविड बेड विविध रुग्णालयात तयार करण्यात आले आहेत. बेडची संख्या ही 12906 वरून 15971 इतकी वाढली आहे. मुंबईत सध्या 4000 बेड शिल्लक आहेत.

मुंबईत कोरोना संसर्गाचं थैमान सुरू आहे. मृत्यूदर 3 टक्क्यांवर पोहचलाय. रुग्णवाढीचा दर इतर शहरांच्या तुलनेत धडकी भरवणारा आहे. मुंबई लोकल, दाटीवाटीनं वसलेली वस्ती यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात आणायची कशी हे आव्हान मनपा प्रशासनासमोर आहे. वाढत्या रुग्णसंख्यावाढीमुळे प्रशासनाने उभारलेली आरोग्य यंत्रणाही येत्या काहीच दिवसात अपूरी पडते की काय? अशी शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

हेही वाचा : #Maharashtra #WeekendLockdown : वीकेंड लॉकडाऊनबाबत तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.