Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Corona | मुंबईत 10 हजार 797 मजले सील, सर्वाधिक मायक्रो कंटेनमेंट झोन कोणत्या वॉर्डमध्ये?

पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱ्या सोसायटींना मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणतात. एखाद्या सोसायटीत पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास अशी इमारत सील केली जाते (Mumbai Corona Micro Containment Zones)

Mumbai Corona | मुंबईत 10 हजार 797 मजले सील, सर्वाधिक मायक्रो कंटेनमेंट झोन कोणत्या वॉर्डमध्ये?
भारतात कोरोनाच्या नव्या विषाणूने शिरकाव केलाय. हा विषाणू ट्रिप म्युटंट असल्याचं समोर आलंय. त्याचाच परिणाम म्हणून देशभरात कोरोना संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या नव्या कोरोना विषाणूचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसलाय. महाराष्ट्रात नुकत्याच गेलेल्या जीनोम सिक्वेंसिंगमधून या नव्या विषाणूची आकडेवारी समजलीय. यानुसार नव्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये 60 टक्के रुग्ण या नव्या कोरोना विषाणूमुळे बाधित झाले आहेत.
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 11:43 AM

मुंबई : मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णसंख्येनंतर महापालिकेने मायक्रो कंटेटमेंट झोन आणि इमारतीतील रुग्ण राहत असलेले मजले सील करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत सध्या 97 कंटेंटमेंट झोन आहेत. तर 1169 सील बिल्डींग/ मायक्रो कंटेनमेंट झोन आहेत. एकूण 10 हजार 797 मजले सील केलेले आहेत. टी वॉर्ड मुलुंडमध्ये मजले सील करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. (Mumbai Corona Update Micro Containment Zones and Sealed building floors)

मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणजे काय?

पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱ्या सोसायटींना मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणतात. एखाद्या सोसायटीत पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास अशी इमारत सील केली जाते. अशा सोसायट्या आता मायक्रो कंटेनमेंट घोषित करण्यात येणार आहेत. सोसायट्यांनी तसा गेटबाहेर फलक लावणे आवश्यक आहे.

या सोसायट्यांनी कोव्हिड संबंधी नियम पाळणे बंधनकारक आहे. बाहेरील व्यक्तीला सोसायटीत प्रवेश देऊ नये. संबंधित गृहनिर्माण सोसायटीने या सर्वाचे निरीक्षण करुन नियमाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदारी घ्यावी, असे आदेश पालिकेने दिले आहेत. मात्र सोसायटीने नियमाची अंमलबजावणी न केल्यास सोसायटीला दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

संबंधित सोसायटीने पुन्हा दुर्लक्ष करुन नियम मोडल्यास 20 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. पालिकेने तसे आदेश दिले असून त्याबाबत परिपत्रकही जारी केले आहे.

महत्त्वाचे नियम काय?

– इमारतीबाहेर पोलिस तैनात करण्यात येतील – बाहेरील व्यक्तीला सोसायटीत प्रवेशबंदी – वर्तमानपत्र विक्रेत्यांनी सोसायटीच्या गेटवर वर्तमानपत्र द्यावे – जीवनावश्यक वस्तू आदी साहित्यही सोसायटीच्या गेटवर स्वीकारावे – सोसायटीतील व्यक्तीला कोरोना चाचणी करायची असल्यास त्यांनी लॅबच्या व्यक्तीला घरी बोलवावे – कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घराबाहेर पडल्यास एफआयआर दाखल होणार

मुंबईतील ताजी आकडेवारी काय?

16 एप्रिल, संध्या 6:00 वाजता

24 तासात बाधित रुग्ण – 8,839

24 तासात बरे झालेले रुग्ण – 9033

बरे झालेले एकूण रुग्ण – 4,63,344

बरे झालेल्या रुग्णांचा दर- 82%

एकूण सक्रिय रुग्ण-85,226 (Mumbai Corona Micro Containment Zones)

दुप्पटीचा दर- 43 दिवस

कोविड वाढीचा दर (9 एप्रिल-15 एप्रिल)- 1.6%

संबंधित बातम्या :

देशात कोरोनाचे 2 लाख 34 हजार 692 नवीन रुग्ण, 1341 जण दगावले

(Mumbai Corona Update Micro Containment Zones and Sealed building floors)

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.