Mumbai Corona Updates : मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या वाढतीच, नव्याने किती रुग्णांची वाढ, किती मृत्यू?

राज्याची राजधानी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच आहे. मागील 24 तासात मुंबईत 1 हजार 709 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीय.

Mumbai Corona Updates : मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या वाढतीच, नव्याने किती रुग्णांची वाढ, किती मृत्यू?
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 8:11 PM

मुंबई : राज्याची राजधानी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच आहे. मागील 24 तासात मुंबईत 1 हजार 709 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीय. तसेच 24 तासात 5 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. यासह मुंबईत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 41 हजार 999 वर गेलीय. आतापर्यंत 3 लाख 17 हजार 830 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तसेच एकूण 11 हजार 528 जणांना कोरोनामुळे मृत्यू झालाय. सध्या मुंबईत 11 हजार 747 कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहे (Mumbai Corona Updates Maharashtra 13 March 2021 Total Covid 19 patient).

दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियंत्रणाबाबत प्रशासनाला विशेष सूचना दिल्यात. तसेच कोविडचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स, उपाहारगृहे यांनी सहकार्य करावे. लॉकडाऊन करून सगळं बंद करणं आम्हालाही नकोय, पण मास्क न घालणे, सुरक्षित अंतर न ठेवणे असे प्रकार घडल्यास आम्हाला कडक निर्बंध लावावे लागतील. त्यासाठी आम्हाला भाग पडू नका, असंही आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज हॉटेल्स, उपाहारगृहे, मॉल्स संघटनांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. यात हे आवाहन केलं.

…तर मुंबईत लॉकडाऊनचा विचार, अतिरिक्त आयुक्तांचा इशारा

दरम्यान, मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी आधीच नागरिकांचं सहकार्य मिळालं नाही तर मुंबईत लॉकडाऊनचा (Mumbai Lockdown) विचार सुरु असल्याचा इशारा दिलाय. मुंबईत पॉझिटिव्हिटी रेट नियंत्रणात असल्याने सध्या अंशत: लॉकडाऊन नाही. मात्र, नागरिकांचं सहकार्य मिळालं नाही, तर मुंबईतही लॉकडाऊन करण्याचा विचार करता येईल, असा सूचक इशारा काकाणी यांनी दिलाय.

मुंबईत रुग्ण वाढते, मात्र कोरोना चाचणीची संख्याही जास्त

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढतीय मात्र, कोरोना टेस्टिंग वाढवली आहे. तसंच पॉझिटीव्हिटी रेट देखील कमी आहे. एकाच भागातून जास्त रुग्ण नाही. ते वेगवेगळ्या भागांत विखुरलेले आहेत. इतर शहरांच्या तुलनेत पॉझिटीव्हिटी रेट कमी आहे, असंही काकाणी यांनी स्पष्ट केलंय.

मुंबईतील नाईट क्लब सर्वात आधी बंद करू; अस्लम शेख यांचे संकेत

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास सर्वात आधी नाईट क्लब बंद होऊ शकतात, असे संकेत दिलेय. विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अस्लम शेख यांनी हे संकेत दिले. गेल्या काही दिवसांपासून नाईट क्लबमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आहे. काही नाईट क्लबवरही कारवाई करण्यात आली आहे. पण त्याने काहीही फरक पडलेला नाही, असं सांगतानाच मुंबईत पहिल्यांदा नाईट क्लब बंद होऊ शकतात, असं शेख म्हणाले.

हेही वाचा :

Mumbai Lockdown news | तर मुंबईत अंशत: लॉकडाऊन, पालकमंत्र्यांचा इशारा

धोका वाढला! नव्या कोरोना रुग्णांची फुफ्फुस लवकर होतायत खराब

मुंबईत लग्‍न समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये ‘हे’ नियम पाळणं बंधनकारक, अन्यथा गुन्‍हा दाखल होणार

व्हिडीओ पाहा :

Mumbai Corona Updates Maharashtra 13 March 2021 Total Covid 19 patient

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.