AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नव्वदीतील ‘तरुणांचे’ लसीकरण! 98 वर्षीय आजी आणि 99 वर्षीय आजोबांनी घेतली लस

मुंबई महापालिकेच्या ट्विटर हँडलवर एक खास ट्वीट करण्यात आलं आहे. त्याला नव्वदीतील 'तरुणांचे' लसीकरण असं कॅप्शन देण्यात आलंय.

नव्वदीतील 'तरुणांचे' लसीकरण! 98 वर्षीय आजी आणि 99 वर्षीय आजोबांनी घेतली लस
मुंबईत नव्वदीतील आजी-आजोबांचे कोरोना लसीकरण
| Updated on: May 09, 2021 | 5:03 PM
Share

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कोरोना लसीकरणावर भर दिल्याचं पाहायला मिळत आहे. रुग्णालयांमध्ये टोकण पद्धतीसह ऑनलाईन स्लॉट पाडून नागरिकांना लस दिली जात आहे. त्याचबरोबर कोरोना लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी लसीकरण केंद्रांची संख्याही वाढवण्यात आली आहे. अशावेळी मुंबई महापालिकेच्या ट्विटर हँडलवर एक खास ट्वीट करण्यात आलं आहे. त्याला नव्वदीतील ‘तरुणांचे’ लसीकरण असं कॅप्शन देण्यात आलंय. (Vaccination of 98 year old grandmother and 99 year old grandfather in Mumbai)

‘दादरच्या कोहिनुर पार्किंग लॉटमधील ड्राईव्ह इन सुविधा असलेल्या लसीकरण केंद्रात आज 98 वर्षीय आजी नलिनी माने आणि 99 वर्षी आजोबा रतन मीर यांनी कोरोनाची लस घेतली आहे’, असं ट्वीट करत मुंबई महापालिकेनं त्यांचा फोटोही ट्वीट केला आहे.

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात लहान मुलांसाठीचे पहिले जम्बो कोव्हिड सेंटर

देशभरात कोरोनाची दुसरी लाट प्रचंड थैमान घालत आहे. पहिल्या लाटेत वयस्कर नागरिकांना कोरोना संसर्गाचा जास्त धोका होता. या दुसऱ्या लाटेसह तिसऱ्या लाटेत लहान मुलं, गर्भवती महिला आणि तरुणांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी चाईल्ड कोव्हिड सेंटर उभारले जाणार आहे. याठिकाणी मुलांसाठी बेड, व्हेंटीलेटर्स, आयसीयूसह सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत लहान मुलांसाठी 500 खाटांचे स्वतंत्र जम्बो कोव्हिड सेंटर सुरु करण्यात येणार आहे.

1 वर्षापासून ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर उपचार

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. हेच मत लक्षात घेऊन मुंबईत 500 खाटांचे लहान मुलांसाठी स्वतंत्र जम्बो कोविड केंद्र सुरू करण्यात येणार आहे. मुंबईत वरळी येथे पालिकेच्या माध्यमातून 500 खाटांचे जम्बो कोविड केंद्र उभारण्यात येणार आहे.

यात एक वर्षापासून ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना दाखल केले जाणार आहे. या लहान मुलांबरोबर आई असणे गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन क्युबिकल पद्धतीने या जम्बो केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. यात 70 टक्के ऑक्सिजन खाटा असतील तर 200 अतिदक्षता विभागातील खाटा असणार आहेत.

संबंधित बातम्या : 

कोविड सेंटरवर शिवसेना-भाजपच्या महिला नेत्यांची धक्काबुक्की; आमदार लव्हेकर, पटेल यांच्यात बाचाबाची

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात म्युकोरमायकोसिसचा झपाट्याने संसर्ग, नव्या संकटाची चाहुल?

Vaccination of 98 year old grandmother and 99 year old grandfather in Mumbai

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.