मुंबईत मराठीच चालणार; इंग्रजी पाट्यांवर महापालिकेचा हातोडा पडणार; पुढच्या आठवड्यापासून थेट कारवाई

दुकाने आणि आस्थापनांच्या नामफलकांवर सुरुवातीला मराठी भाषेत, देवनागरी लिपीत नाव लिहिणे आवश्यक आहे. तसेच इतर कोणत्याही भाषेत नाव लिहिले जाणार असेल, तर त्या भाषेच्या तुलनेत मराठीतील नाव हे मोठ्या आणि ठळक अक्षरांतच असले पाहिजे याबाबतचा शासन निर्णय 17 मार्च रोजी जारी करण्यात आला.

मुंबईत मराठीच चालणार; इंग्रजी पाट्यांवर महापालिकेचा हातोडा पडणार; पुढच्या आठवड्यापासून थेट कारवाई
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्रीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 5:50 PM

मुंबईः मुंबई महापालिकेच्या (Mumbai Corporation) हद्दीतील सर्व दुकाने-आस्थापनांचे नामफलक (Nameplate)ठळक मोठ्या आकारातील मराठी अक्षरात असावेत असा आदेश महापालिकेने काढला होता, त्याकरता आजची 31 मे पर्यंतची मुदतही देण्यात आली होती. त्यानुसार अनेक दुकानांनी आपले इंग्रजी नामफलक बदलले आहेत मात्र अनेक दुकानांचे नामफलक अजूनही मोठ्या इंग्रजी अक्षरातच असल्याचे दिसून येत आहे. आजच्या मुदतीनंतर महापालिका प्रशासन पुढील एका आठवड्यापर्यंत सर्वेक्षण (Survey) करणार असून त्यानंतर कारवाईला सुरुवात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

साडेचार लाख दुकाने रडारवर

दुकाने आणि आस्थापनांच्या नामफलकांवर सुरुवातीला मराठी भाषेत, देवनागरी लिपीत नाव लिहिणे आवश्यक आहे. तसेच इतर कोणत्याही भाषेत नाव लिहिले जाणार असेल, तर त्या भाषेच्या तुलनेत मराठीतील नाव हे मोठ्या आणि ठळक अक्षरांतच असले पाहिजे याबाबतचा शासन निर्णय 17 मार्च रोजी जारी करण्यात आला.

तसंच महापालिकेनंही परिपत्रक काढून मुंबईतील दुकाने-आस्थापनांना नामफलक मराठीत रुपांतरीत करण्याविषयी आवाहन केले होते.

हे सुद्धा वाचा

कारवाई कशी होणार?

पहिल्या टप्प्यात दुकानांची पाहणी करण्यात येणार असून मराठी नामफलक बंधनकारक असल्याबाबत दुकानदार व आस्थापना यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पालिकेच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यास दुकाने व अस्थापना कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल अशी सूचनाही देण्यात आली आहे.

नामफलक मराठीत नसल्यास पालिका कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. या नोटिशीनंतरही नामफलकात बदल केला नाही तर न्यायालयाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

तसेच ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशा आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड-किल्ल्यांची नावे असू नयेत. या नियमाचे उल्‍लंघन केल्यास संबंधित दुकाने व आस्थापना मालकांवर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियमनुसार न्यायालयीन कारवाई करण्यात येईल अशी सूचना देण्यात आली आहे.

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.