मुंबई पोलीस आयुक्त राजभवनात, हेमंत नगराळेंची राज्यपाल कोश्यारींशी चर्चा

पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर हेमंत नगराळे यांची राज्यपालांसोबत ही पहिलीच भेट होती (Hemant Nagrale meets Bhagatsingh Koshyari )

मुंबई पोलीस आयुक्त राजभवनात, हेमंत नगराळेंची राज्यपाल कोश्यारींशी चर्चा
हेमंत नगराळे यांची भगतसिंह कोश्यारींशी चर्चा
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 1:43 PM

मुंबई : मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी राज्यपालांची भेट घेतली. नगराळेंनी मुंबईत राजभवनामध्ये भगतसिंह कोश्यारी (Maharashtra Governor Bhagatsingh Koshyari) यांची सदिच्छा भेट घेतली. पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर हेमंत नगराळे यांची राज्यपालांसोबत ही पहिलीच भेट होती. भेटीत दोघांमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. (Mumbai CP Hemant Nagrale meets Maharashtra Governor Bhagatsingh Koshyari at Rajbhavan)

मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग (Prambir Singh) यांनी ‘लेटरबॉम्ब’ टाकत गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केला. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

कोण आहेत हेमंत नगराळे?

हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांचा 19 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. हेमंत नगराळे यांनी 2016 मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कारभार स्वीकारला होता. त्यानंतर 2018 मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. नगराळे याआधी पोलिस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून कार्यरत होते. मार्च 2021 मध्ये परमबीर सिंह यांची उचलबांगडी करुन हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा चार्ज देण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे मी हा कार्यभार स्वीकारलाः हेमंत नगराळे

सर्वांना माहिती आहे, मुंबई पोलीस सध्या एका कठीण समस्येतून जात आहेत. ही समस्या पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मदतीने सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माझी नेमणूक केलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे मी हा कार्यभार स्वीकारला आहे. मुंबई पोलिसांची जी प्रतिमा मलिन झाली आहे, त्याला येणाऱ्या दिवसात चांगलं करण्याचा प्रयत्न करणार. आमच्या मुंबई शहरामधील अधिकारी कर्मचारी सगळ्यांचं सहकार्य, सहभाग या कार्यामध्ये लाभणार असल्याचंही हेमंत नगराळे यांनी काल आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताना सांगितलं.

संबंधित बातम्या :

मुंबई पोलीस दलातील विशेष पथकाची पुनर्रचना, पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंचा पहिला निर्णय

अनिल देशमुखांकडून वाझेंना महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट, परमबीर सिंगांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

(Mumbai CP Hemant Nagrale meets Maharashtra Governor Bhagatsingh Koshyari at Rajbhavan)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.