55 वर्षापेक्षा वयस्क पोलिसांना घरीच थांबण्याचे निर्देश, मुंबई पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

गेले सलग तीन दिवस दररोज एका पोलिस कर्मचाऱ्याचा 'कोरोना'मुळे झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. महत्वाचं म्हणजे हे सर्व पोलिस कर्मचारी 50 वर्षे वयापेक्षा जास्त वयाचे होते (Mumbai CP Directions to Police Constables)

55 वर्षापेक्षा वयस्क पोलिसांना घरीच थांबण्याचे निर्देश, मुंबई पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Apr 28, 2020 | 1:28 PM

मुंबई : मुंबई पोलिस दलातील तिघा हवालदारांना ‘कोरोना’मुळे प्राण गमवावे लागल्यानंतर पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अत्यंत तातडीची पावलं टाकली आहेत. 55 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या पोलिस खात्यातील ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Mumbai CP Directions to Police Constables)

ज्यांचं वय 55 वर्षापेक्षा जास्त आहे, त्यांनी बंदोबस्तामध्ये सहभागी होऊ नये, अशा सूचना मुंबई पोलिस आयुक्तांनी दिल्या आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गाचं नियंत्रण करण्यासाठी दिवसरात्र परिश्रम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह आता पोलिस कर्मचारीही कोरोनाचे बळी ठरत आहेत.

गेले सलग तीन दिवस दररोज एका पोलिस कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व पोलिस कर्मचारी 50 वर्षे वयापेक्षा जास्त वयाचे होते. 55 वर्षापेक्षा अधिक वयाच्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पोलिस आयुक्तांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

मुंबई पोलिस दलातर्फे उपाययोजना काय?

1) 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व कर्मचार्‍यांना घरीच राहण्याचे आदेश. 2) मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार असणाऱ्या 52 वर्षावरील कर्मचारीही घरीच राहतील 3)  03/05/2020 पर्यंत पोलिस स्टेशनचे कर्मचारी 12 तास ड्युटी / 24 तास विश्रांती अशी शिफ्ट 4)  वैद्यकीय देखरेखीखाली 12 हजार जवानांसाठी एचसीक्यू टॅबलेट पुरवठा 5) प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी 20 हजार जवानांना मल्टीविटामिन आणि प्रथिनेपूरक आहार

हेही वाचा : ‘कोरोना’शी झुंजताना प्राण गमावलेल्या दोन्ही पोलिसांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाखांची मदत

गेल्या तीन दिवसात मुंबई पोलिस दलातील तीन पोलिसांचा बळी गेला होता. कुर्ला ट्रॅफिक विभागात हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या हवालदाराचा काल (27 एप्रिल) कोरोनामुळे मृत्यू झाला होता. याआधी 26 एप्रिलला 52 वर्षीय हवालदाराचं निधन झालं, तर 25 एप्रिलला 57 वर्षीय हवालदारालाही कोरोनामुळे प्राण गमवावे लागले होते. संबंधित कर्मचारी वाकोला पोलिस ठाण्यात कार्यरत होता, तर वरळीचा रहिवासी होता. (Mumbai CP Directions to Police Constables)

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यापूर्वी मृत्यू झालेल्या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच ‘कोरोना’शी लढा देणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार असल्याची घोषणा केली होती.

संबंधित बातम्या : 

मुंबईत कोरोनामुळे आणखी एका पोलीस हवालदाराचा मृत्यू, 3 दिवसात 3 पोलिसांच्या मृत्यूने खळबळ

(Mumbai CP Directions to Police Constables)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.