Karan Tiwary | आयपीएलमध्ये सिलेक्शन न झाल्याने नाराज, मुंबईत युवा क्रिकेटपटूचा गळफास
क्रिकेटपटू करण तिवारीने दहा ऑगस्टला रात्री मित्राला कॉल केला. सिलेक्शन न झाल्याने आपण आत्महत्या करत असल्याची माहिती त्याने मित्राला दिली.
मुंबई : आयपीएलमध्ये सिलेक्शन न झाल्याने नाराज झालेल्या मुंबईतील युवा क्रिकेटपटूने टोकाचे पाऊल उचलले. 27 वर्षीय करण तिवारीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. (Mumbai Cricket Player Karan Tiwary found dead at home Suicide suspect)
कुरार पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, करण तिवारी मालाड पूर्व भागातील जानू कंपाऊंडमध्ये इमारतीत आई आणि भावासोबत राहत होता. स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळणारा करण आयपीएलसाठी तयारीही करत होता.
आयपीएलसाठी संघाची निवड झाल्याची माहिती त्याला मिळाली, मात्र आपलं सिलेक्शन न झाल्याने तो काहीसा नाराज असल्याचे म्हटले जाते. त्याने दहा ऑगस्टला रात्री 10.30 वाजता राजस्थानमध्ये राहणाऱ्या आपल्या मित्राला कॉल केला. सिलेक्शन न झाल्याने आपण आत्महत्या करत असल्याची माहिती त्याने मित्राला दिली.
हेही वाचा : “आशुडा, अनेक प्रश्न अनुत्तरीत सोडलेस…” मयुरी देशमुखकडून भावनांना वाट मोकळी
घाबरलेल्या मित्राने राजस्थानमध्ये असलेल्या करणच्या बहिणीला फोन केला, तिने आपल्या आईला तातडीने फोन केला. मात्र त्याचे कुटुंबीय त्याच्या खोलीत पोहोचून दरवाजा तोडेपर्यंत करणने गळफास घेतला होता, अशी माहिती आहे. घरातील चादरीने पंख्याला दोर लटकावून करणने आत्महत्या केली.
करणच्या कुटुंबाने कुरार पुलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे. करण तिवारी क्रिकेट खेळण्यात माहीर होता. त्याला कुठल्याही किंमतीवर आयपीएलमध्ये खेळायचे होते, असे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
VIDEO : 36 जिल्हे 72 बातम्या | 12 August 2020 https://t.co/AXOYU0iuzu
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 12, 2020
(Mumbai Cricket Player Karan Tiwary found dead at home Suicide suspect)