AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांनो, दादरमध्ये शॉपिंग करताना आता कार पार्किंगचं टेन्शन नाही!, थेट कोहिनूरमध्ये कार पार्क करा, कशी? वाचा सविस्तर…

शिवसेना भवनच्या शेजारी असणाऱ्या कोहिनूर स्वेअरमध्ये आता तुम्हाला कार पार्क करता येणार आहे. तसंच प्लाझा थिएटरमध्येही तुम्ही तुमची कार पार्क करू शकता. मुंबई महापालिका आणि दादर व्यापारी संघाने एकत्र येत हा निर्णय घेतलाय.

मुंबईकरांनो, दादरमध्ये शॉपिंग करताना आता कार पार्किंगचं टेन्शन नाही!, थेट कोहिनूरमध्ये कार पार्क करा, कशी? वाचा सविस्तर...
| Updated on: May 18, 2022 | 3:59 PM
Share

मुंबई : मुंबईत सध्या पार्किंगची समस्या वाढत चालली आहे. अश्यात जर तुम्ही दादर (Dadar) मार्केटमध्ये खरेदीसाठी जाणार असाल, तर तुमची गाडी नेमकी कुठे लावायची हा प्रश्न आ वासून उभा राहातो. पण सध्या मुबंई महापालिकेने यावर एक प्रभावी उपाय शोधून काढला आहे. तुमची कार तुम्ही अगदी ऐन बाजारपेठेत पार्क करू शकणार आहात. शिवसेना भवनच्या शेजारी असणाऱ्या कोहिनूर स्वेअरमध्ये (Kohinoor Square) आता तुम्हाला कार पार्क करता येणार आहे. तसंच प्लाझा थिएटरमध्येही (Plaza Cinema) तुम्ही तुमची कार पार्क करू शकता.

ऐन बाजारपेठेत करा कार पार्क

तुमची कार तुम्ही अगदी ऐन बाजारपेठेत पार्क करू शकणार आहात. शिवसेना भवनच्या शेजारी असणाऱ्या कोहिनूर स्वेअरमध्ये आता तुम्हाला कार पार्क करता येणार आहे. तसंच प्लाझा थिएटरमध्येही तुम्ही तुमची कार पार्क करू शकता. मुंबई महापालिका आणि दादर व्यापारी संघाने एकत्र येत हा निर्णय घेतलाय.

कार पार्किंग कुठे कुठे करता येईल?

दादरमध्ये खरेदीसाठी किंवा फिरण्यासाठी गेलेल्या लोकांना आपली गाडी पार्क कुठे करावी हा प्रश्न पडतो. त्यावर आता उपाय शोधण्यात आला आहे.दादरमध्ये वॉलेट कार पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अंतर्गत तुम्ही शिवसेना भवनच्या शेजारी असलेल्या कोहिनूर स्वेअरमध्येही तुमची कार पार्क करू शकता. या शिवाय प्लाझा सिनेमाघरातही ही सुविधा उपलब्ध आहे. तिथेही तुम्ही तुमची कार पार्क करू शकता.

किती पैसे द्यावे लागणार?

ऐन बाजार पेठेत पालिका आणि व्यापारी संघाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या वॉलेट पार्किंगसाठी तुम्हाला काही पैसे मोजावे लागणार आहेत. सुरूवातीला तुम्हाला 100 रूपये द्यावे लागतील. ते पहिल्या तासासाठीच्या पार्किंगसाठी अआसेल. तर त्यानंतरच्या प्रत्येक तासासाठी 25 रूपये मोजावे लागणार आहेत.

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.