समीर वानखेडेंना पहिला धक्का, मुंबई सत्र न्यायालयाने याचिका फेटाळली! आता पुढे काय?
सत्र न्यायालयानं वानखेडे यांची याचिका फेटाळून लावली आहे. तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते उच्च न्यायालयात सांगा. सत्र न्यायालयासाठी हे प्रकरण पूर्णपणे संपलं आहे, असं सत्र न्यायालयाने म्हटलं आहे. दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्यानंतर आता समीर वानखेडे उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना पहिला धक्का बसला आहे. प्रभाकर साईल याने केलेले आरोप ग्राह्य धरु नये, यासाठी वानखेडे यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. हायकोर्टात प्रकरण असल्यामुळे सुनावणीला सत्र न्यायालयानं नकार दिला आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. (Sameer Wankhede’s petition was rejected by the Mumbai Sessions Court)
वानखेडे यांनी सत्र न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. वैयक्तीक बदनामी केली जात आहे. सोशल मीडियावर कुटुंबियांची खासगी माहिती उघड केली जात आहे. याबाबत त्यांनी एक प्रतिज्ञापत्र साद करुन तीन मागण्या केल्या होत्या. या सगळ्याचा परिणाम तपासावर होत असल्याचंही वानखेडे यांनी त्यात म्हटलं आहे. त्यामुळे तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, सत्र न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे. तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते उच्च न्यायालयात सांगा. सत्र न्यायालयासाठी हे प्रकरण पूर्णपणे संपलं आहे, असं सत्र न्यायालयाने म्हटलं आहे. दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्यानंतर आता समीर वानखेडे उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
प्रभाकर साईलला पोलिस संरक्षण
समीर वानखेडे यांच्यापासून आपल्या आणि कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे आपल्याला पोलिस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी प्रभाकर साईल यांनी केली होती. त्यांच्या मागणीनुसार साईल यांना आता पोलिस संरक्षण देण्यात आलं आहे. साईल यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, साईल यांनी सहार पोलिसांकडे संपूर्ण माहिती नोंदवली आहे. आम्ही सुरक्षेच्या मागणीसाठी गेलो होतो. आम्हाला सुरक्षा देण्यात आली आहे. सहार पोलिसांत तक्रार केली असून, क्राईम ब्रँचकडे सर्व पुरावे जमा केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
यात काही मागणी झालेली आहे. त्यातील काही मागण्या पूर्ण केल्या आहेत. आमच्या क्लाईंटच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे आम्ही सुरक्षेची मागणी केली आहे. आमची ही मागणी मान्य करण्यात आली, असं साईल यांचे वकील म्हणाले. एनसीबीने क्रुझवर मारलेल्या धाडीतील प्रभाकर साईल साक्षीदार आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल करून एनसीबीचा भांडाफोड केला होता. त्यानंतर ते संपर्काबाहेर होते. कालही त्यांना मुंबईच्या बाहेर राहावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी थेट समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत.
साईल यांचे आरोप काय?
आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. 25 कोटींचा बॉम्ब टाका. 18 कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं साळी यांचा दावा आहे. आपण केपी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला आहे.
त्यानंतर गोसावीने मला फोन केला आणि पंच म्हणून राहण्यास सांगितलं. एनसीबीने 10 कोऱ्या कागदांवर माझी सही घेतली. तसेच मी गोसावींना 50 लाखांच्या दोन बॅगाही दिल्या होत्या, असंही प्रभाकर साईलनी सांगितलं. 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटाने गोसावीने मला फोन केला होता. तसेच 2 ऑक्टोबर रोजी 7.30 वाजेपर्यंत तयार राहण्यास मला सांगण्यात आलं. गोसावींनी मला काही फोटोही पाठवले होते. फोटोत जे लोक दिसत आहेत, त्यांचे हे फोटो मला दाखवण्यात आले होते. ग्रीन गेटवर याच लोकांची ओळख पटवण्यास सांगितल्याची धक्कादायक माहितीही साईल यांनी दिली आहे.
इतर बातम्या :
‘बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं म्हणून सांगतील’, महाविकास आघाडीवर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणारच, पालकमंत्री सुभाष देसाईंचं खासदार इम्तियाज जलील यांना प्रत्युत्तर
Sameer Wankhede’s petition was rejected by the Mumbai Sessions Court