Aryan Khan : आर्यन खान प्रकरणात सुनील पाटील यांनी SIT समोर नोंदवला जबाब; पुढील कारवाई काय?

रविवारी संध्याकाळी सुनील पाटील यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यातून डीसीपी झोन वन कार्यालयात आणण्यात आलं. मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकासमोर पाटील यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. पाटील यांचा जबाब नोंदवल्यानंतर एसआयटीची टीम काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Aryan Khan : आर्यन खान प्रकरणात सुनील पाटील यांनी SIT समोर नोंदवला जबाब; पुढील कारवाई काय?
सुनील पाटील
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 7:26 PM

मुंबई : आर्यन खान प्रकरणात सुनील पाटील हे मास्टरमाईंड असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यानंतर सुनील पाटील यांनी स्वत: माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण दिलंय. रविवारी संध्याकाळी सुनील पाटील यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यातून डीसीपी झोन वन कार्यालयात आणण्यात आलं. मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकासमोर पाटील यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. पाटील यांचा जबाब नोंदवल्यानंतर एसआयटीची टीम काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Sunil Patil filed a reply before the Mumbai SIT In Aryan Khan case)

भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज आणि भाजप आमदार आशिष शेलार यांनी सुनील पाटील यांच्याबाबत मोठा खुलासा केला होता. सुनील पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंध आहेत. सुनील पाटील हेच या संपूर्ण प्रकरणाचे मास्टरमाईंड आहेत. असा आरोप मोहित कंबोज यांनी केला होता. या सगळ्या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी कंबोज यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. त्यानंतर आता स्वत: सुनील पाटील यांनी माध्यमांसमोर येत स्पष्टीकरण दिलंय.

सुनील पाटील यांचे स्पष्टीकरण काय?

सुनील पाटील यांनी स्वत: माध्यमांसमोर येत या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. आर्यन खान प्रकरणात सुनील पाटील हा मास्टर माईंड असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, मी या प्रकरणाचा मास्टरमाईंड नाही. समीर वानखेडे यांच्याशी माझा कधीही संपर्क झाला नाही, असं स्पष्टीकरण सुनील पाटील यांनी एएनआयशी बोलताना दिलंय.

त्याचबरोबर ‘गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये मी मुंबईत आलो होतो. तेव्हा मला राहायला घर नव्हतं. त्यामुळे चार सहा महिने मी ललित हॉटेलमध्ये थांबलो होतो. ललितमध्ये काहीच नव्हतं. राष्ट्रवादीचे नेते तिथे येत होते. शराब, कबाब असं सांगितलं जात आहे. मोहित कंबोजला सांगा मी दारू पीतच नाही. मी तिथे राहत होतो. पण पार्टीत नसायचो. सीसीटीव्ही फुटेज पाहा. त्यात कळेलच’, असं सुनील पाटील यांनी म्हटलंय.

मोहित कंबोज यांना आव्हान

‘आधी त्यांनी ऋषिकेश देशमुख यांचं नाव घेतलं. मी ऋषी देशमुखला ओळखत नाही. त्यांनी वळसे पाटीलचं नाव घेतलं. बनाव रेकॉर्डिंग दाखवली. त्याचाही तपास झाला पाहिजे. वळसे पाटलांना मी कधीच भेटलो नाही. अनिल देशमुख कोरोना काळात एकदा धुळ्यात आले होते. तेव्हा त्यांची भेट झाली. त्यानंतर त्यांच्याशी कधी भेट झाली नाही’, असंही पाटील यांनी म्हटलंय. ‘मी जर बदल्यांचं रॅकेट चालवत आहे तर माझ्याकडे किमान 100 कोटी तरी असावेत ना. मी मोहित कंबोजला चॅलेंज करतो की धुळ्यात जाऊन माझ्या प्रॉपर्टीचा तपास कर आणि नंतर रॅकेटची वार्ता कर’, असं आव्हान सुनील पाटील यांनी मोहित कंबोज यांना दिलं आहे.

इतर बातम्या :

मनिष भानुशालीने दिल्लीत बोलवून मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली; सुनील पाटील यांची धक्कादायक माहिती

ऋषिकेश देशमुखांना ओळखत नाही, नवाब मलिक, वळसे-पाटलांना कधीच भेटलो नाही; सुनील पाटलांनी आरोप फेटाळले

Sunil Patil filed a reply before the Mumbai SIT In Aryan Khan case

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.