Mumbai Power Cut | मुंबई-ठाणे थांबले; पहिल्यांदाच सर्वाधिक वेळ बत्तीगुल
मुंबईसह उपनगर, नवी मुंबई, ठाण्यातील अनेक भागात वीज प्रवाह अचानकपणे खंडित झाल्याची घटना घडली आहे. (Mumbai Power Cut in all area)
मुंबई : मुंबईसह उपनगर, नवी मुंबई, ठाण्यातील अनेक भागात वीज प्रवाह अचानकपणे खंडित झाल्याची घटना घडली आहे. मुंबईतील लालबाग, परळ, अंधेरी, दादर, ठाणे, वडाळा या भागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. ग्रीड फेल्युअरमुळे हा बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या तासाभरापासून मुंबईत लाईट नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आतापर्यंत सर्वाधिक जास्त वेळ लाईट जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. (Mumbai Power Cut in all area)
मुंबईतील पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक लोकल ट्रेन या जागच्या जागी थांबल्या आहेत. गेल्या 15 मिनिटात रेल्वे गाड्यात ताटकळत उभ्या आहेत. यामुळे अत्यावश्यक आणि शासकीय सेवेतील कर्मचारी लोकलमध्ये अडकले आहे.
Mumbai Suburban train services disrupted due to grid failure: Central Railways Chief Public Relation Officers (CPRO) #Maharashtra https://t.co/FxU4upma08
— ANI (@ANI) October 12, 2020
मुंबई लोकलला फटका
मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. मुंबईतील उपनगरीय लोकल सेवेला याचा फटका बसला आहे. मुंबईत वीजपुरवठा खंडीत झाल्याने पश्चिम, मध्य या रेल्वेला फटका बसत आहे. कामावर जाण्यासाठी निघालेले अनेक चाकरमानी रेल्वेत खोळंबले आहे. लोकलमधील वीज आणि पंखे बंद आहे. त्यामुळे ऑक्टोबर हिटमुळे आधीच नागरिक त्रस्त असताना आता वीज खंडीत झाल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
सिग्नल यंत्रणा बंद
मुंबईतील रस्त्यांवर अनेक ठिकाणी सिग्नल यंत्रणाही ठप्प झाल्या आहे. रस्त्यावरील सर्वच ठिकाणच्या सिग्नल हे बंद पडले आहेत. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी ट्राफिक जाम होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
रुग्णालय, परीक्षांना फटका
मुंबईतील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णालयांना याचा फटका बसला आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर किंवा इतर तांत्रिक उपकरण बंद पडण्याची शक्यता आहे. अनेक रुग्णालयांकडे पावर बॅक अप आहे का, जनरेटर आहे का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे.
तर दुसरीकडे ऑनलाईन परीक्षांनाही याचा फटका बसला आहे. काही विद्यार्थ्यांना अंधारात, तसेच प्रचंड उकाड्यात पेपर द्यावा लागत आहे.(Mumbai Power Cut in all area)
मुंबईत कोणकोणत्या भागात वीज गायब?
दादर लालबाग परळ प्रभादेवी वडाळा ठाणे नवी मुंबई पनवेल बोरिवली मालाड कांदिवली
बत्ती गुल, सर्व काही जागच्या जागी थांबलं मुंबईची बत्ती गुल झाल्यामुळे सर्व काही जागच्या जागी थांबलं. वीजेअभावी रेल्वेच्या तिन्ही लाईन ठप्प झाल्या. तीनही मार्गावरील लोकल आहे त्या ठिकाणी थांबल्या. नेमक्या लोकल का थांबल्या हे प्रवाशांनाही काहीवेळ समजत नव्हतं.
संबंधित बातम्या :
mumbai power cut ! मुंबई-ठाण्यातील बत्तीगुल झाल्याने रेल्वे, इंटरनेट ठप्प; रुग्णालयांनाही फटका
Mumbai Power Cut: मुंबईची बत्ती गुल; कार्यालये आणि रेल्वे वाहतूक ठप्प