Bandra Fire : शाहरुख खानच्या ‘मन्नत’जवळील 21 मजली इमारतीमध्ये आग, फायर ब्रिगेडच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न
अभिनेता शाहरुख खानच्या बांद्रा पश्चिमेच्या बॅन्ड स्टॅन्ड परिसरातील 'मन्नत' बंगल्या जवळील एका इमारतीला भीषण आग लागली आहे. जिवेश असं या इमारतीचं नाव आहे. एकूण 21 मजली असलेल्या या इमारतीच्या 16 व्या मजल्यावर ही आग लागलीय.
मुंबई : अभिनेता शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) बांद्रा पश्चिमेच्या बॅन्ड स्टॅन्ड परिसरातील ‘मन्नत’ बंगल्या जवळील एका इमारतीला भीषण आग लागली आहे. जिवेश असं या इमारतीचं नाव आहे. एकूण 21 मजली असलेल्या या इमारतीच्या 14 व्या मजल्यावर ही आग लागलीय. ही आग लेव्हल दोनची (Level 2 Fire) असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. तसंच ही आग रात्आरी पावणे आठच्या सुमारास लागल्याची माहिती आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) 8 गाड्या रवाना झाल्याची माहिती मिळतेय. ही आग इमारतीच्या 16 व्या मजल्यावर लागल्यामुळे फायर ब्रिगेडच्या जवानांना ही आग विझवण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Maharashtra | A level II fire broke out on the 14th floor of Jivesh Building at Bandstand Road, Bandara (W). 8 fire tenders reach the site. Further details awaited: Mumbai Fire Brigade(MFB) pic.twitter.com/orLyyFbCm2
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) May 9, 2022
14 व्या मजल्यावर आग
वांद्रे पश्चिम परिसरातील उच्चभ्रू लोकांची घरं असलेल्या बॅन्ड स्टॅन्ड परिसरात ही घटना घडली आहे. महत्वाची बाब म्हणजे आग लागलेली जिवेश नावाची इमारत ही अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. जिवेश ही एकूण 21 मजल्याची इमारत असून तिच्या 14 व्या मजल्यावर ही आग लागली आहे. मात्र, आगीचं रौद्ररुप पाहता ती अन्य मजल्यांवर पोहोचण्याची भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 14 व्या मजल्यापर्यंत पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाच्या मोठ्या शिडीचा वापर करण्यात येतोय.
दरम्यान, ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. तसंच आग लागली त्या घरात कुणी अडकून पडले आहे का? याची माहितीही अद्याप मिळालेली नाही. तसंच कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्तही अद्याप समोर आलेलं नाही.
#MumbaiFire #Bandra West Near SRK’s residence Mannat Fire on the 13th floor 8 fire engines have been pressed More details awaited
Video- by a reporter pic.twitter.com/qOt2rrqECn
— Mayank Bhagwat (@mayankbhagwat) May 9, 2022