Mumbai Fire : मुंबईतील वन अविघ्न इमारतीच्या 35 व्या मजल्यावर अग्नितांडव!

मुंबईतील वन अविघ्न इमारतीच्या 35व्या मजल्याला आग लागल्यानं खळबळ, आगीचे प्रचंड लोट येत असल्याचं घबराट

Mumbai Fire : मुंबईतील वन अविघ्न इमारतीच्या 35 व्या मजल्यावर अग्नितांडव!
Follow us
| Updated on: Dec 15, 2022 | 11:21 AM

मुंबई : मुंबईतील वन अविघ्न इमारतीच्या (One Avighna Fire News) 35व्या मजल्याला आग लागल्यानं खळबळ उडाली आहे. आगीचे प्रचंड लोट येत असल्याचं घबराट पसरली आहे. अग्निशमन दलाकडून (Mumbai Fire News Today) आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे. गेल्या वर्षी याच इमारतीला भीषण आग लागली होती. वर्षभरानंतर आता पुन्हा एकदा याच इमारतीत आगीची दुर्घटना घडल्यानं हाहाकार माजलाय.

आज सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी ही आग लागली असल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. ही लेव्हल-1 ची आग असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, दुसऱ्यांदा इमारतीत आग भडकल्यानं रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

पाहा व्हिडीओ :

लोअर परळ येथील भारत माता सिनेमा जवळ असलेल्या महादेव पालव मार्ग येथे वन अविघ्न पार्क ही इमारत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु आहे.

पाहा व्हिडीओ :

गेल्या वर्षीदेखील वन अविघ्न इमारतीला मोठी आग लागली लागली होती. या आगीने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, वर्षभरानं पुन्हा एकदा वन अविघ्न इमारतीला नेमकी आग कशामुळे लागली? या आगीचं नेमकं कारण काय? असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत.

तूर्तास या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. अद्यापतरी या आगीत कुणीही जखमी झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाही. मात्र या आगीमुळे इमारतीतील इतर घरांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.