Breaking : रेल्वेच्या AC डब्याखाली आग, धूर… कुठे घडली घटना?

ट्रेनखाली आग लागल्याचे कळाल्यानंतर प्रवाशी वर्गात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र वेळेवर रेल्वे प्रशासन व आपत्कालीन पथक पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली गेली.

Breaking : रेल्वेच्या AC डब्याखाली आग, धूर... कुठे घडली घटना?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 4:23 PM

सुनिल जाधव, मुंबईः स्टेशनवरून निघालेल्या रेल्वेच्या एसी (Railway AC) डब्याखाली अचानक आग लागल्याची विचित्र घटना समोर आली आहे.  रेल्वे कर्मचारी आणि आपत्कालीन पथकाने समय सूचकता दाखवली. आग विझवण्यासाठी तत्परतेने प्रयत्न केले. त्यामुळे वेळीच मोठं संकट टळलं. रेल्वेतील प्रवासी तसेच बचाव पथकातील कर्मचाऱ्यांना काहीही इजा झाली नाही. मुंबई-हैदराबाद एक्सप्रेसमध्ये आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

कुठे घडली घटना?

मुंबई हैद्राबाद एक्सप्रेसच्या D1 AC डब्याखाली ही आग लागली. आगीमुळे एसीच्या डब्याखालून धूर निघत होता. ही माहिती तत्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांना देण्यात आली. ठाकुर्ली ते कल्याण दरम्यान ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ ही प्रयत्न करून आग विझवली. आग विझवेपर्यंत रेल्वेत बसलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अनेक प्रवाशांनी रेल्वेच्या खाली उतरणं पसंत केलं. बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याच्या फवाऱ्यांनी आग पूर्णपणे विझवली. त्यानंतर रेल्वेतील प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

रेल्वेची पुन्हा तपासणी

ठाकुर्ली ते कल्याण स्टेशनदरम्यान बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली. त्यानंतर कल्याण स्टेशनवर गाडीची पुन्हा तपासणी करण्यात आली. संपूर्ण तपासणी केलयानंतरच रेल्वे पुढच्या प्रवासासाठी रवाना करण्या आली. कल्याण येथील स्टेशन मास्टर यांनी सदर माहिती दिली.

चालकाच्या सतर्कतेमुळे अपघात टळला

मुंबई हैदराबाद एक्सप्रेस ठाकुर्ली स्टेशनवरून पुढे जात असताना कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान गाडीचे ब्रेक जाम झाले. त्यामुळे आगीची ठिणगी पडली. अचानक एसीच्या डब्याखालून आगीचे धूर निघू लागले. मात्र ट्रेन चालकाच्या सतर्कतेमुळे नेमकं काय घडलंय, याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांना देण्यात आली.

या दरम्यान ट्रेनखाली आग लागल्याचे कळाल्यानंतर प्रवाशी वर्गात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र वेळेवर रेल्वे प्रशासन व आपत्कालीन पथक पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली गेली.

त्या नंतर कल्याण स्टेशनवर गाडी नेऊन गाडीची तपासणी करून पुन्हा गाडी पुढच्या दिशेने रवाना केली असल्याची माहिती कल्याण स्टेशन मास्टर यांनी दिली.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.