मुंबईत आजारांमध्ये लक्षणीय घट, हेपटायटिस आणि ग्रॅस्ट्रो रुग्णांची संख्या घटली

महानगरपालिकेच्‍या सातत्‍यपूर्ण राबवलेल्या जनजागृतीचा हा सकारात्‍मक परिणाम असल्याचे बोललं जात आहे. (Mumbai Hepatitis And Gastro Patient Started Decreasing)

मुंबईत आजारांमध्ये लक्षणीय घट, हेपटायटिस आणि ग्रॅस्ट्रो रुग्णांची संख्या घटली
मुंबईत लॉकडाऊनच्या हालचालींना वेग
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 4:23 PM

मुंबई : यंदा बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातील जलजन्य आजारांच्या रुग्णंसख्येत आकडेवारीनुसार लक्षणीय घट झाली आहे. मुंबईत हेपटायटिस रुग्‍णसंख्‍येत 83.60 टक्के घट झाली. तर ग्रॅस्ट्रो रुग्णांच्या संख्येत 68 टक्के घट झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्‍या सातत्‍यपूर्ण राबवलेल्या जनजागृतीचा हा सकारात्‍मक परिणाम असल्याचे बोललं जात आहे. (Mumbai Hepatitis And Gastro Patient Started Decreasing)

यंदा बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातील जलजन्‍य आजारांच्‍या रुग्‍णसंख्‍येत लक्षणीय घट झाली आहे. जानेवारी ते नोव्‍हेंबर या 11 महिन्‍यांच्‍या कालावधीचा तुलनात्‍मक अभ्‍यास केला असता वर्ष 2019 च्‍या तुलनेत वर्ष 2020 मध्‍ये जलजन्‍य आजार असणाऱ्या हेपटायटिस ‘ए’ व ‘ई’ रुग्‍णसंख्‍येत तब्‍बल 83.60 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. तर गॅस्‍ट्रो बाधितांच्‍या संख्येत 68.04 टक्‍क्‍यांची घट नोंदविण्‍यात आली आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या महानगरपालिका सार्वजनिक आरोग्‍य खात्‍याद्वारे देण्‍यात आली आहे.

मुंबई पालिका क्षेत्रात जलजन्‍य आजारांबाबत दरवर्षी सातत्‍यपूर्ण जनजागृती केली जाते. यंदा त्यासोबतच कोविड प्रतिबंधाबाबत देखील प्रभावी जाणीव जागृती नियमितपणे करण्यात येत आहे. याअंतर्गत प्रामुख्‍याने सातत्‍याने हात धुणे, उघडयावरचे अन्‍न न खाणे, कटाक्षाने शुध्‍द पाणी पिणे इत्यादींचा समावेश आहे.

या जनजागृती प्रयत्‍नांना नागरिकांनी देखील अतिशय चांगला प्रतिसाद दिला. त्‍यामुळेच गेल्यावर्षी म्‍हणजेच जानेवारी ते नोव्‍हेंबर 2019 दरम्‍यान 1 हजार 494 एवढी असणारी हेपटायटिस ‘ए’ व ‘ई’ रुग्‍णसंख्‍या आता घटली आहे. यंदा म्‍हणजेच जानेवारी ते नोव्‍हेंबर 2020 या 11 महिन्‍यांच्‍या कालावधीत फक्त 245 इतकी झाली आहे.

हेपटायटिस ‘ए’ व ‘ई’ रुग्‍णसंख्‍या ही जानेवारी ते नोव्‍हेंबर 2015 या दरम्‍यान १ हजार ७५ एवढी होती. याच 11 महिन्‍यांच्‍या कालावधीसाठी ही रुगणसख्‍ंया 2016 मध्‍ये 1 हजार 425, वर्ष 2017 मध्‍ये 1 हजार 105, 2018 मध्‍ये 1 हजार 074 एवढी नोंदवण्‍यात आली होती.

जलजन्‍य आजार असणाऱ्या गॅस्‍ट्रो रुग्‍णांच्‍या संख्‍येत देखील गेल्‍यावर्षीच्‍या तुलनेत लक्षणीय घट नोंदविण्‍यात आली आहे. जानेवारी ते नोव्‍हेंबर 2019 या 11 महिन्‍यांच्‍या कालावधी दरम्‍यान 7 हजार 247 रुग्‍ण आढळून आले होते. तर जानेवारी ते नोव्‍हेंबर 2020 या दरम्‍यान 2 हजार 316 रुग्‍ण आढळून आले. याचाच अर्थ गेल्‍यावर्षीच्‍या तुलनेत गॅस्‍ट्रो रुग्‍णसंख्‍येत तब्‍बल 68.04 टक्‍क्‍यांची घट नोंदविण्‍यात आली आहे.

गॅस्‍ट्रो रुग्‍णसंख्‍या ही जानेवारी ते नोव्‍हेंबर 2015 या दरम्‍यान 10 हजार 257 एवढी होती. याच 11 महिन्‍यांच्‍या कालावधीसाठी सदर रुग्णसख्‍ंया 2016 मध्‍ये 9 हजार 462, वर्ष 2017 मध्‍ये 7 हजार 911, 2018 मध्‍ये 7 हजार 315 एवढी नोंदवण्‍यात आली होती.

हेपटायटिस ‘ए’ व ‘ई’ आणि गॅस्‍ट्रो या दोन्‍ही जलजन्‍य आजारांच्‍या उपलब्‍ध आकडेवारी समोर आली आहे. यानुसार जानेवारी ते नोव्‍हेंबर 2019 दरम्‍यान 9 हजार 741 रुग्‍ण आढळून आले होते. तर याच कालावधीसाठी यंदाच्‍या वर्षी म्‍हणजेच जानेवारी ते नोव्‍हेंबर 2020 दरम्‍यान 2 हजार 561 रुग्‍ण आढळून आले आहेत. याचाच अर्थ गेल्‍यावर्षीच्‍या तुलनेत जलजन्‍य आजारांच्‍या रुग्‍णसख्‍ंयेत 70.70 टक्‍क्‍यांची घट नोंदविण्‍यात आली आहे. (Mumbai Hepatitis And Gastro Patient Started Decreasing)

संबंधित बातम्या : 

लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना लोकलमध्ये नो एंट्री, रेल्वे प्रशासनाचा निर्णय

कोव्हिड लसीचे डोस साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेजची तयारी, मुंबईत कोणती जागा निश्चित?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.