मुंबईत मुलगी प्रियकरासोबत पळाली, आईकडून पोटच्या लेकराची हत्या केल्याची कबुली, मग न्यायालयाकडून जामीन का? वाचा…

पोटची 23 वर्षाची मुलगी प्रियकरासोबत घरातून पळून जात असल्याच्या रागातून एका आईने तिची हत्या केल्याची कबुली दिली. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी 40 वर्षीय महिलेला जामीन मंजूर केलाय.

मुंबईत मुलगी प्रियकरासोबत पळाली, आईकडून पोटच्या लेकराची हत्या केल्याची कबुली, मग न्यायालयाकडून जामीन का? वाचा...
मुंबई उच्च न्यायालय
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 11:53 AM

मुंबई : पोटची 23 वर्षाची मुलगी प्रियकरासोबत घरातून पळून जात असल्याच्या रागातून एका आईने तिची हत्या केल्याची कबुली दिली. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी 40 वर्षीय महिलेला जामीन मंजूर केलाय. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र त्यामागं कारणंही तसंच आहे. या महिलेने मुलीच्या हत्येचा दावा केला असला तरी या प्रकरणातील एका प्रत्यक्षदर्शीने ही हत्या आईने केली नसून सहआरोपी भावाने केल्याचं सांगितलं. त्यामुळे या आईचा आरोपी मुलाला वाचवण्याचा प्रयत्न मात्र अपयशी ठरला. आरोपी भावाने बहिण पळून जात असल्याच्या रागातून तिला पकडून तिच्याच ओढणीने तिचा गळा आवळून हत्या केली आहे (Mumbai High Court grant bail to accused mother in murder of daughter for love).

न्यायालयाने या आरोपी महिलेला जामीन देताना म्हटलं, “प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांने आपल्या जबाबात सहआरोपीने बहिणीचा गळा आवळून हत्या केल्याचं सांगितलंय. तसेच आरोपी महिला पीडितेच्या पायावर बसलेली होती.” आरोपी महिला आहे आणि वास्तवातील घडलेल्या बाबींचा विचार केल्यास या महिलेला आणखी ताब्यात ठेवण्याची गरज नाही, असंही कोर्टाने म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

23 वर्षीय पीडित मुलगी आपल्या कुटुंबाच्या इच्छेविरूद्ध एका मुलावर प्रेम करत होती. प्रेयकराबरोबर घरातून पळून जात असताना कुटुंबियांनी मुलीला पकडले आणि तिच्याच ओढणीने गळा आवळून खून केला. यानंतर पीडितेची आई पप्पू वाघेला यांनी स्वतः दक्षिण मुंबईतील पायडोनी पोलीस स्टेशन गाठलं आणि मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर तेथील पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढे तपासात आरोपी महिलेच्या जावयाने पीडितीची हत्या सासूने केली नसल्याचं सांगितलं. तसेच ही हत्या आपल्या मेव्हण्याने गळा दाबून केल्याचं पाहिलं असल्याचंही नमूद केलं. यानंतर पोलिसांनी तात्काळ पीडितेचा भाऊ आकाश वाघेला याला अटक केली. प्रत्यक्षदर्शी जावयाने आपल्या जबाबात म्हटलं, “मी 17 नोव्हेंबर 2019 रोजी अर्जदाराच्या घरी पोहोचलो तेव्हा दरवाजा बंद केलेला होता. त्यानंतर मी जेव्हा धक्का देऊन दरवाजा उघडला तेव्हा मेव्हुणी जमिनीवर पडलेली होती आणि पप्पू वाघेला आपल्या मुलीच्या पायावर उभी होती. तसेच मेव्हुणा आकाश मुलीचा गळा आवळत होता.”

मृत मुलीच्या दुसऱ्या भावाने देखील याला दुजोरा दिला. आपला आरोपी भाऊ हत्या झाली त्या दिवशी 17 नोव्हेंबर रोजी रडत घराबाहेर आला आणि त्याने बहिणीची गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली असल्याचं पोलिसांना सांगितलं.

आरोपी भावाकडून बनाव, पोलीस तपासात सत्य उघड

ही घटना अचानक घडली असा युक्तिवाद आरोपीचे वकील सय्यद अब्बास यांनी केला. मात्र, प्रत्यक्षदर्शीने आरोपीने आपल्या मुलीचा गळा दाबून हत्या केली नसल्याचं म्हटलं. सहाय्यक सरकारी वकील (एपीपी) ए. ए. आर. कपडणीस यांनी आईने हत्येची कबुली केल्याचा युक्तीवाद केला. मात्र, कोर्टाने प्रत्यक्षदर्शीच्या जबाबावर विश्वास ठेवून 25,000 रुपयांचा वैयक्तिक ओळखपत्र (पीआर बाँड) आणि त्याच रकमेच्या एक किंवा दोन जामिनदाराच्या अटीवर आरोपी पप्पू वाघेला यांना जामीन मंजूर केला.

हेही वाचा :

आंतरजातीय प्रेमसंबंधाचा राग, उशीने तोंड दाबून मुलीची हत्या

रात्रीच्या सुमारास घरी, प्रेयसीच्या कुटुंबाची मारहाण, प्रियकराचा मृत्यू

प्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

व्हिडीओ पाहा :

Mumbai High Court grant bail to accused mother in murder of daughter for love

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.