Doctors : सरकारी सेवा बजावणा-या डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, राज्य सरकारच्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती

सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या खासगी सेवा देण्यावर राज्य सरकारने बंधने घातली होती. पण याच्याविरोधात दाद मागण्यासाठी डॉक्टरांनी 2012 कोर्टाचं दाद ठोठावलं होतं.

Doctors : सरकारी सेवा बजावणा-या डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, राज्य सरकारच्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती
सरकारी सेवा बजावणा-या डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, राज्य सरकारच्या आदेशाला हायकोर्टाची स्थगितीImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 7:11 AM

मुंबई – सरकारी सेवा बजावणा-या डॉक्टरांना (Doctor) मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) मोठा दिलासा दिला आहे. सरकारी सेवा (Government Service) बजावत असताना डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करू करू शकत नाहीत. या राज्य सरकारच्या आदेशाला अखेर हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. मागच्या दहा वर्षांपासून हे प्रकरण कोर्टात आहे. डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिल्यानंतर सरकारी सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या चेहऱ्यावरती हास्य उमटलले. सरकारने 2012 ला आध्यादेश काढला होता. अध्यादेशाला काही डॉक्टरांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं.

मुंबई उच्च न्यायालयात डॉक्टरांच्या संघटनेने आव्हान देण्याचा निर्णय घेतला.

सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या खासगी सेवा देण्यावर राज्य सरकारने बंधने घातली होती. पण याच्याविरोधात दाद मागण्यासाठी डॉक्टरांनी 2012 कोर्टाचं दाद ठोठावलं होतं. 7 ऑगस्ट 2012 राज्य सरकारने काढलेल्या आदेशाला डॉक्टरांनी त्यावेळी विरोध केला होता. राज्य शासनाच्या निर्णया विरोधात दाद मागण्यासाठी डॉक्टरांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. परंतु दहावर्षानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. विशेष म्हणजे सरकारने काढलेल्या आदेशामुळे आमचं नुकसान होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मॅटनं मात्र राज्य सरकारचा निर्णय बरोबर असल्याचं सांगत डॉक्टरांची ही मागणी फेटाळून लावली होती. मुंबई उच्च न्यायालयात डॉक्टरांच्या संघटनेने आव्हान देण्याचा निर्णय घेतला.

हे सुद्धा वाचा

डॉक्टरांना विशेष व्यवसायरोध भत्ता सुरू करण्यात आला

सरकारी रुग्णालयात काम करणारे काही डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आल्याने शासनाने खासगी सेवा देण्यावर बंधने घातली. त्याचबरोबर सगळ्या सरकारी डॉक्टरांना विशेष व्यवसायरोध भत्ता सुरू करण्यात आला होता. त्यानुसार पुण्यातील भोर येथील वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉ. अनिल राठोड यांनी अॅड. विनोद सांगवीकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस. एम. मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.