युतीमधील एक-एक घटकपक्ष संपणार अन्… ; जयंत पाटील यांचं सर्वात मोठं विधान

NCP Leader Jayant Patil on BJP Shivsena Ajit Pawar Group Yuti : जातनिहाय जनगणना करण्यासाठी सरकार का घाबरत आहे?, असा थेट सवाल जयंत पाटील यांनी विचारला आहे. तसंच महायुती आणि भाजपच्या मित्रपक्षांबाबतही जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. वाचा जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

युतीमधील एक-एक घटकपक्ष संपणार अन्... ; जयंत पाटील यांचं सर्वात मोठं विधान
Follow us
| Updated on: Dec 30, 2023 | 3:30 PM

अक्षय मंकणी, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 30 डिसेंबर 2023 : मागच्या वर्षी शिवसेना पक्षात फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. नंतर त्यांनी शिवसेना पक्षावर दावा केला. या सगळ्या घडामोडीत महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर यंदाच्या वर्षी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी युती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार शिंदे सरकारमध्ये जात उपमुख्यमंत्री झाले. या सगळ्या गोष्टी आठवण्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेलं विधान… जयंत पाटील यांनी महायुती- भाजप आणि मित्रपक्षांबाबत एक महत्वाचं विधान केलं आहे.

महायुतीबाबत जयंत पाटील काय म्हणाले?

आधी युपीए सरकारच्या काळात जरी मनमोहन सिंग हे पंतप्रधान असले तरी मित्रपक्षांच्या म्हणण्याला अर्थ असायला. घटक पक्षाने मांडलेली भूमिका मंत्रिमंडळाच्या बैठकीत लक्षात घेतली जायची. आज मात्र तसं दिसत नाही. महायुतीतील इतर पक्षांसाठी धोक्याची घंटा आहे. भाजपसोबत असलेल्यांना संपवतो. शिवसेनेचे तेच झाले. आता जे सोबत आहे, त्यांना भाजपमध्ये विलीन करायला सांगतील. शिवसेनेच्या बाबतीत तेच झालं. शिवसेना ऐकत नाही, म्हणून त्यांचे उमेदवार पाडले गेले, असं जयंत पाटील म्हणाले.

आधी युपीए सरकार असायचे, एनडीएचं सरकार असायचं आता मोदी सरकार आहे. आता इतर मंत्र्यांचे अधिकारच नाही. लोकांना कोण मंत्री आहेत तेच माहिती नाही.भाजप म्हणतंय येत्या निवडणुकीत आम्ही 400 पेक्षा जागांवर जिंकू, असं झाल्यास इतर पक्षच ते शिल्लक ठेवणार नाही आणि भाजपचा डोमिनंन्स वाढेल, असं जयंत पाटील म्हणाले.

आरक्षणाच्या मुद्द्यावर जयंत पाटील यांचं मत

जाती धर्मात तेढ निर्माण करून त्यावर आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं षडयंत्र आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या भावनाही लक्षात घेतल्या पाहिजेत. केंद्रात आणि राज्यात भाजपशासित सरकार असल्याने 50% च्या वर आरक्षण देण्यासाठी घटनेत दुरुस्ती करणं त्यांच्यासाठी अवघड नाही. जातनिहाय जनगणना करण्यासाठी सरकार का घाबरत आहे? हेच कळत नाही, असा सवाल जयंत पाटील यांनी विचारला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.