नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ विधानाचा अर्थ अजित पवारांनी सांगावा; जितेंद्र आव्हाडांचं ओपन चॅलेंज

Jitendra Awhad on PM Narendra Modi Statement About Sharad Pawar : नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील कालच्या सभेतील विविध मुद्द्यांची चर्चा होतेय. त्यांच्या भाषणातील मुद्द्यांचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. नरेंद्र मोदी यांच्या कालच्या भाषणातील वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नरेंद्र मोदींच्या 'त्या' विधानाचा अर्थ अजित पवारांनी सांगावा; जितेंद्र आव्हाडांचं ओपन चॅलेंज
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 5:27 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल पुण्यात जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख केला. हे विधान कुणीही वैयक्तिक टीका म्हणून घेऊ नये, असं म्हटलं. पण पंतप्रधान एखादं विधान करतात आणि तेही निवडणूक काळात ते एखादं वक्तव्य करत असतील तर त्याचे राजकीय अर्थ काढले जाणं सहाजिक आहे. नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा सार अन् त्या विधानाच्या मागचा पुढचा भाग पाहिल्यानंतर ते विधान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याच बाबत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. त्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे.

जितेंद्र आव्हाडांचं अजितदादांना आव्हान

नरेंद्र मोदी यांनी जे म्हटलं, ते आत्मा एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर आत्म्याची गोष्ट करतो. त्यांना नेमकं काय म्हणायचं? जोपर्यंत शरद पवार मरत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्र आपल्याला मिळणार नाही? ही त्यांच्या मनातली सल आहे. हे त्यांच्या मनाला सतावतंय? शरद पवारांच्या मृत्यूवर बोलणं, ही घाणेरडी भाषा आहे. ‘भटकती आत्मा’चा अर्थ काय होतो, हे भाजपने सांगावं. विशेष म्हणजे अजित पवारांनी याच्यावर उत्तर द्यावं, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

निवडणुकीवर भाष्य

असली शिवसेनेला नकली शिवसेना भाजपचे लोक समजतात. जमिनीवरचे कार्यकर्ते उद्योग बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहेत. केसेसला घाबरून पोरं घरी बसलेले आहेत. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना काही वेळ घरी बसवलं होतं. मात्र निवडणुकीच्या निमित्ताने सगळे बाहेर पडले आहेत. कार्यकर्ते एकत्र यायला नाही, तर पांगायला सुरुवात झालेली आहे. पहाटेपासून कार्यकर्ते आलेत. ऊन वाढलंय. त्यांना विश्रांतीची आता थोडी गरज आहे. पण सर्वसामान्यांचा आवाज संसदेत पोहोचावा म्हणून लोक एकत्र आलेत, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे की, शरद पवार उद्धव ठाकरे यांची लाट पुन्हा एकदा महाराष्ट्रात येणार आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे सर्व येऊन या ठिकाणी मोठमोठे सभा होतील. मशाल पेटवायची गरज नाही, मशाल पेटलेलीच आहे. लोकांच्या हक्काची ही लढाई आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.