खिचडी घोटाळ्यातील पैसे राऊतांच्या लेकीच्या खात्यात; किरीट सोमय्या यांचे गंभीर आरोप
Kirit Somaiya on Suraj Chavan Arrest and Khichadi Scam : ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण यांच्या अटकेनंतर किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद... संजय राऊत आणि कुटुंबियांवर सोमय्यांचे गंभीर आरोप. किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले? राऊतांवरचे आरोप नेमके काय? वाचा सविस्तर...
गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 18 जानेवारी 2024 : ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण यांना कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून अटक झाली आहे. या अटकेनंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केलेत. संजय राऊत यांची कन्या विधिता राऊत , भाऊ संदीप राऊत आणि सुजित पाटकर यांच्या खात्यात खिचडी घोटाळ्यातील लाखो-करोडो रुपय गेले. याची सर्व चौकशी झाली पाहिजे, असं किरीट सोमय्या म्हणालेत.
किरीट सोमय्या म्हणाले…
सुरज चव्हाण यांनी 132 कोटी रुपयांचा खिचडी कॉन्ट्रॅक्ट्स दिलं. पेमेंट केलं. त्यामध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या पार्टीच्या अनेक नेत्यांचे बेनामी कंपनींना सुरज चव्हाण यांच्या खात्यात दीड कोटीहून अधिक रुपये गेले. अमोल गजानन कीर्तीकर यांच्या खात्यात देखील कोट्यवधी रुपय गेले. रवींद्र वायकर प्रकरण हिशोब द्यावा लागेल. महापालिकेने परवानगी दिली. इकबाल सिंह चहल यांनी परवानगी दिली, त्याबाबत ईडीने विचारलं पाहिजे. परवानगी कशी दिली? खेळाचे मैदान आहे कशी परवानगी दिली?, याची चौकशी व्हायला पाहिजे, असं सोमय्या म्हणालेत.
संजय राऊतांवर टीकास्त्र
सूरज चव्हाण यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. सूडाच्या भावनेतून अटक झाली असल्याचं राऊत म्हणाले. त्यांच्या या टीकेला सोमय्यांनी उत्तर दिलं आहे. संजय राऊत चोर कोतवालला बोलत आहे. तुमच्याकडे जे पैसे आलेत त्याचा हिशोब द्या. पत्राचाळ तुमच्या बायकोच्या खात्यात पैसे आले होते. त्याचा हिशोब द्या. नाहीतर जेलमध्ये जावं लागले. घोटाळा केला असेल तर तुम्ही तक्रार करा. तुम्ही पाप केलं. त्याचा हिशोब तर द्यावा लागेल, असं सोमय्या म्हणालेत.
साळवींच्या घरावर एसीबीची कारवाई, सोमय्या म्हणाले…
राजन साळवी यांच्या घरावर एसीबीने धाड टाकली आहे. यावर सोमय्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एसीबीकडून ही प्रक्रिया सुरू आहे. ते त्यांच्या पद्धतीने काम करत आहे. संजय राऊत हे विषयांतर करत आहे. कोविड, खिचडी, ऑक्सिजन घोटाळा आणि कफन चोरले. या सर्व घोटाळाबाबत कारवाई होणारच आहे, असं सोमय्या म्हणालेत.