‘लाडकी बहिण’ योजनेबाबत महिला व बालविकास खात्याचा मोठा निर्णय; आता बँकांना…

Ladki Bahin Yojana Update : महाराष्ट्र सरकारची 'लाडकी बहीण योजना' सध्या लोकप्रिय ठरत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलावर्ग मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे. अशातच लाभार्थ्यांचे पैसे कापले जात असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर महिला व बालविकास खात्याने मोठा निर्णय घेतलाय. वाचा सविस्तर...

'लाडकी बहिण' योजनेबाबत महिला व बालविकास खात्याचा मोठा निर्णय; आता बँकांना...
लाडकी बहिण योजनेबाबत मोठा निर्णयImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 08, 2024 | 10:34 AM

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सध्या चांगलीच चर्चेत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, त्याचा फॉर्म भरण्यासाठी महिला तासन् तास रांगेत उभ्या राहिल्याचं चित्र महाराष्ट्रभर दिसलं. फॉर्म भरलेल्या पैकी काही महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. तर काहींना हा लाभ मिळणं अद्याप बाकी आहे. असं असताना आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या लाभार्थी महिलांचे पैसे कापले जात असल्याचं समोर आलं आहे. बँकेकडूनच लाभार्थ्यी महिलांचे पैसे कापले गेल्याचं उघडकीस आलं आहे. त्यानंतर महिला व बालविकास खात्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’वरून राज्यात सुरू असलेल्या राजकीय वादाला अद्याप पूर्णविराम लागलेला नाही. त्यातच आता या योजनेबाबत येणाऱ्या तक्रारी सोडवण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालय जोरकसपणे कामाला लागलं आहे. या योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे पैसे बँकांकडून कापण्यात आल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. याची दखल घेत महायुती सरकारने लवकरच बँकांशी चर्चा करण्याचं निश्चित केलं आहे. लाभार्थी महिलांचे पैसे कापू नयेत, यासाठी पत्रव्यवहार करण्याची तयारीही सुरू केल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

नेमकं काय घडलं?

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ चा अनेक महिलांना लाभ झाला आहे. मात्र हा लाभ महिलांना मिळताना त्यातील काही पैसे कापले जात असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर महिला व बालविकास मंत्रालयाने मोठा निर्णय निर्णय घेतला आहे. महिला लाभार्थ्यांचे पैस कापले जाऊ नयेत, यासाठी महिला व बालविकास मंत्रालयाकडून बँकांशी संवाद साधला जाणार आहे. या बँकांशी पत्रव्यवहार करण्याची तयारीही महिला व बालविकास खात्याने सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ काय आहे?

राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने नवं धोरण आणलं आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ शिंदे सरकारने घोषित केली. या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या लाभार्थी महिलांना दरमाह 1 हजार 500 रुपये दिले जाणार आहेत. याची सुरुवातही झाली आहे. पहिल्या टप्प्यात फॉर्म भरलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.