Mumbai Local | मुंबईची ‘लाईफलाईन’ 12 ऑगस्टपर्यंत बंदच, लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस ट्रेनही रद्द
12 ऑगस्टपर्यंत ट्रेनचे आरक्षण केलेल्या प्रवाशांना तिकीटाचे 100 टक्के रिफंड दिले जाईल, असे रेल्वेने स्पष्ट केलं आहे.
मुंबई : मुंबईची ‘लाईफलाईन’ असलेली लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी आणखी दीड महिना बंदच राहणार आहे. 12 ऑगस्टपर्यंत देशभरातील लोकल, मेट्रो, लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि ईएमयू ट्रेनची वाहतूक बंदच ठेवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. (Mumbai Local Mail Express Train to remain stand cancelled)
‘कोरोना’च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रेल्वे बोर्डाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विशेष लोकल वगळता इतर उपनगरी लोकल वाहतूक 12 ऑगस्टपर्यंत बंद राहील.
जून अखेरपर्यंत केलेल्या आगाऊ तिकीट आरक्षणाचे संपूर्ण रिफंड देण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला होता. आता हा कालावधी एक जुलैपासून 12 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यानुसार ट्रेनचे आरक्षण केलेल्या प्रवाशांना तिकीटाचे 100 टक्के रिफंड दिले जाईल, असे रेल्वेने स्पष्ट केलं आहे.
It has been decided that regular time-tabled passenger services including Mail/Express, passenger and suburban services stand cancelled up to 12.08.2020: Railway Board pic.twitter.com/Pt1EIreC5y
— ANI (@ANI) June 25, 2020
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल
केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सध्या लोकलने प्रवास करता येणार आहे. 15 जूनपासून मुंबईत या विशेष लोकल सुटल्या. दर दिवशी मध्य रेल्वेवर विशेष लोकलच्या 200 तर पश्चिम रेल्वेवर 130 लोकलच्या फेऱ्या होत आहेत.
लोकलचा वापर केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणारे म्हणजेच पोलीस, नर्स, डॉक्टर, पालिकेचे सफाई आणि इतर कर्मचारी, पत्रकार अशा काही ठराविक कर्मचाऱ्यांनाच करता येणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांनी अद्याप लोकलने प्रवास करता येणार नाही.
संबंधित कर्मचाऱ्यांनी शासकीय ओळखपत्र दाखवल्यास त्याला तिकीट मिळू शकते. तसेच पासधारक तिकिटांची वैधता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
VIDEO : Mumbai Local Train | मुंबईत ऑगस्टपर्यंत लोकलसेवा बंद, लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही परवानगी नाहीhttps://t.co/ZZcCZVpy4J
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 25, 2020
(Mumbai Local Mail Express Train to remain stand cancelled)